आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळायला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी करताना केकेआरला रोखले. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याला संधी दिली. ईशांती याने तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये सामना खेळला.
A dream return for Ishant Sharma.
Lost the spot in the Indian team, last played IPL in 2021, returning to the side when Delhi lost 4 consecutive matches and he just went for 19 runs by taking 2 wickets from 4 overs. pic.twitter.com/DxoqthC6DS
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2023
दिल्ली कॅपिटल्स हंगामातील आतापर्यंतचा सर्वात अपयशी संघ ठरला आहे. पहिल्या पाच सामन्यात त्यांना विजय नोंदवता आला नाही. सहाव्या सामन्यात त्यांनी विजयाच्या निर्धाराने उतरत संघात तीन महत्त्वपूर्ण बदल केले. या संघात ईशांत शर्मा याला संधी दिली गेली. त्याने आपला अखेरचा आयपीएल सामना 2021 हंगामात पंजाब किंग्सविरुद्ध 2 मे रोजी खेळलेला. त्यानंतर तब्बल 717 दिवसांनी तो आयपीएलच्या रणांगणात उतरला.
आपला पुनरागमनाचा सामना खेळताना ईशांतने आपल्या अनुभवाची कमाल दाखवली. त्याने या सामन्यात पूर्ण चार षटके गोलंदाजी करताना केवळ 19 धावा देताना दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. 723 दिवसांनी त्याला आयपीएलमध्ये बळी मिळवण्यात यश आले.
ईशांत मागील जवळपास दीड वर्षापासून भारतीय संघातून देखील बाहेर आहे. ईशांत याने आयपीएलमध्ये 2008 हंगामात केकेआरसाठी खेळतानाच पदार्पण केले होते. त्यानंतर डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स या संघासाठी त्याने आपले कौशल्य दाखवले. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये 92 सामने खेळताना 72 बळी आपल्या नावे केले होते.
(Season Campaigner Ishant Sharma Tremendous Comeback For Delhi Capitals In IPL 2023 Against KKR)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर मात
प्रमोशन फेरीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाचा विजय