पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात सिद्धांत दोषी 47 याच्या अर्धशतकी खेळीसह रोहित हडके(4-54), सोहेल शेख(3-61) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संयुक्त क्लब संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 55 धावांनी पराभव करून विजय मिळवला. तर एमसीए संयुक्त जिल्हा संघ व डेक्कन जिमखाना यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर 5 गुणांची कमाई केली.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन दिवसाच्या लढतीतील सामन्यात काल संयुक्त क्लब संघाने 54.1 षटकात 233 धावा केल्या. याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 27.5षटकात अवघ्या 61धावावर संपुष्टात आला व त्यामुळे संयुक्त संघाने पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळाली.
आज संयुक्त क्लब संघाने 32.1षटकात 7बाद118धावावर डाव घोषित करून व्हेरॉक संघाला 290 लक्ष विजयासाठी दिले. यामध्ये सिद्धांत दोषी 47, वरून नेने नाबाद 19 यांनी धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 52षटकात 235धावावर संपुष्टात आला. यात अमन मुल्ला 50, यज्ञेश मोरे 44, आदिराज कदम 16, रोहित चौधरी 16 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. संयुक्त क्लबकडून रोहित हडके 4-54, सोहेल शेख 3-61, मिहीर किल्लेदार 1-37 यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 55धावांनी विजय मिळवून दिला. सामनावीर रोहित हडके ठरला.
दुसऱ्या डेक्कन जिमखाना क्लब क्रिकेट मैदानावरील सामन्यात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने आज 82षटकात 5 बाद 280धावावर आपला डाव घोषित केला. यात अभिषेक पवार नाबाद 131, वेंकटेश काणे 38, सौरभ गढक 34, सनतकुमार माळगे 18, प्रथमेश बजाज 17 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाचा डाव 50.3षटकात 147धावावर संपुष्टात आला. यात अजय बोरुडे 58, यशोधन शुक्ला 13, सुहेल श्रीखंडे 13, अथर्व वनवे 14, श्लोक धर्माधिकारी नाबाद 27यांनी धावा केल्या. एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडून रामेश्वर दौड 4-30, रिषभ बंसल 2-12, ओंकार मोहिते(2-19), वेंकटेश काणे(1-8)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 133धावांची आघाडी मिळवून दिली. पण अनिर्णित ठरलेल्या सामन्यात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर डेक्कन जिमखानाचा पराभव केला व 5 गुणांची कमाई केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदान: पहिला डाव: संयुक्त क्लब संघ: 54.1 षटकात सर्वबाद 233 धावा(मिहीर किल्लेदार 62(90), नचिकेत वेर्लेकर नाबाद 70(58), रोहित हडके 37(35), शिवम ठोंबरे 31, यश जागडे 4-13, हर्षवर्धन पवार 3-43, विकी ओस्वाल 1-46, अमन मुल्ला 1-55) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी:27.5षटकात सर्वबाद 61धावा(अद्वैत मुळ्ये 30(66), सोहेल शेख 5-15, वरून नेने 4-4, रोहित हडके 1-9); पहिल्या डावात संयुक्त क्लब संघाकडे 172 धावांची आघाडी;
दुसरा डाव: संयुक्त क्लब संघ: 32.1षटकात 7बाद118धावा(डाव घोषित)(सिद्धांत दोषी 47(70), वरून नेने नाबाद 19, यश जगदाळे 2-18, रोहित चौधरी 2-17, आदिराज कदम 1-11) वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 52षटकात सर्वबाद 235धावा(अमन मुल्ला 50(58), यज्ञेश मोरे 44(80), आदिराज कदम 16, रोहित चौधरी 16, रोहित हडके 4-54, सोहेल शेख 3-61, मिहीर किल्लेदार 1-37); संयुक्त क्लब 55धावांनी विजय; सामनावीर-रोहित हडके;
डेक्कन जिमखाना क्लब क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 82षटकात 5 बाद 280धावा(डाव घोषित)(अभिषेक पवार नाबाद 131(163), वेंकटेश काणे 38(49), सौरभ गढक 34(64), सनतकुमार माळगे 18, प्रथमेश बजाज 17, ओंकार मोहिते नाबाद 26, आर्यन बांगले 2-62, श्लोक धर्माधिकारी 2-74, रेहान खान 1-64) वि.डेक्कन जिमखाना: 50.3षटकात सर्वबाद 147धावा(अजय बोरुडे 58(91), यशोधन शुक्ला 13, सुहेल श्रीखंडे 13, अथर्व वनवे 14, श्लोक धर्माधिकारी नाबाद 27, रामेश्वर दौड 4-30, रिषभ बंसल 2-12, ओंकार मोहिते 2-19, वेंकटेश काणे 1-8); एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडे 133धावांची आघाडी;