पुणे, 13 डिसेंबर 2023: क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत पंजाब पेट्रीएटस, या संघाने सलग दुसरा विजय मिळवला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने पुणे जॅगवॉर्स संघाचा 44-36 असा पराभव करून पाहिला विजय मिळवला. महिला एकेरीत बेंगळुरूच्या अरिणा रोडीनोवाने पुण्याच्या डायना मर्सिनचेविकाचा 15-5 असा तर, पुरुष एकेरीत बेंगळुरूच्या रामकुमार रामनाथन याने पुण्याच्या लुकास रोसोल चा 13-7 असा पराभव करून ही आघाडी वाढवली. मिश्र दुहेरीत बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवा व विष्णू वर्धन यांनी पुण्याच्या डायना मर्सिनचेविका व रीत्विक बोलीपल्ली यांचा 11-9 असा तर पुरूष दुहेरीत विष्णू वर्धन व रामकुमार यांनी पुण्याच्या रुत्विक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर एरिना रोडीनोवा ठरली.
दुसऱ्या सामन्यात पंजाब पेट्रीएटस संघाने दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाचा 43-37 असा पराभव केला. महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीन हिने दिल्लीच्या सहजा यमलापल्लीचा 11-9 असा तर, पुरूष एकेरीत पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंगचा दिल्लीच्या डेनिस नोव्हाक याने 9-11 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत पंजाबच्या अर्जुन कढेने कोनी पेरीनच्या साथीत दिल्लीच्या सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझीयनचा 11-9 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीत पंजाबच्या अर्जुन कढे व दिग्विजय प्रताप सिंग यांनी दिल्लीच्या डेनिस नोव्हाक व जीवन नेद्दूचेझीयनचा 12-8 असा पराभव संघाला विजय मिळवून दिला.
तिसऱ्या सामन्यात हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाने गुजरात पँथर्स संघाचा 46-34 असा पराभव केला. महिला एकेरीत हैद्राबादच्या एलेन परेझने गुजरातच्या कारमान कौर थंडीला 13-7 असे नमविले. पुरुष एकेरीत निकी पोनाचाने गुजरातच्या सुमित नागलवर 12-8 असा पराभव करून आघाडी मिळवली. मिश्र दुहेरीत हैद्राबादच्या एलेन परेझने साकेत मायनेनी च्या साथीत गुजरातच्या मुकुंद ससीकुमार व कारमान कौर थंडी यांचा 11-9 असा पराभव करून विजयी आघाडी घेतली. अखेरच्या पुरूष दुहेरीत हैद्राबादच्या साकेत मायनेनी व निकी पोनाचा यांनी सुमित नागल व मुकुंद ससीकुमार यांना 10-10 असे बरोबरीत रोखले. सामन्याची मानकरी एलेन परेझ ठरली.
आजच्या अखेरच्या सामन्यात मुंबई लियॉन आर्मी संघाने बंगाल विझार्ड्स संघाचा 44-36 असा पराभव करून विजय मिळवला. महिला एकेरीत मुंबईच्या सौजन्या बाविशेट्टीने बंगालच्या मारिया तीमोफिव्हाचा 11-9 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. पुरूष एकेरीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिसने बंगालच्या श्रीराम बालाजीचा 12-8 असा पराभव करून संघाची आघाडी वाढवली. मिश्र दुहेरीत विजय सुंदर प्रशांत व सौजन्या बाविशेट्टीने बंगालच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व मारिया तीमोफिव्हाचा 14-6 असा पराभव करून आघाडीत आणखी भर घातली. पुरूष दुहेरीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिस व विजय सुंदर प्रशांत यांना बंगालच्या श्रीराम बालाजी व अनिरुध्द चंद्रशेखर या जोडीकडून 7-13 असा पराभव पत्करावा लागला. सामन्याचा मानकरी अर्नेस्ट गुलबिस ठरला.
गुण तक्त्यात दुसऱ्या दिवस अखेर पंजाब पेट्रीएटस संघ 84 गुणांसह अव्वल स्थानी असून बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघ 83 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Second win for Punjab Patriots in 5th Tennis Premier League tournament)
महत्वाच्या बातम्या –
अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत डेक्कन जिमखाना, ईस्टर्न रेल्वे संघांचा दुसरा विजय
७०वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा । हिमाचल प्रदेशला विजेतेपद, महाराष्ट्र उपांत्य फेरीत गारद