गुजरात भारतातील दारुमुक्त राज्य आहे. तरीही २०१७ च्या आयपीएल दरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल राजकोटच्या रस्त्यांवर भर रात्री दारुच्या नशेत सायकल वरुन पडला होता.
यावेळी मॅक्सवेल, मागूण येणाऱ्या गाडीखाली गेला असता. मात्र मॅक्सवेल थोडक्यात बचावला.
याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्राने बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे नुकताच केला आहे.
असे आहे प्रकरण-
२०१७ साली मॅक्सवेल किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी, मॅक्सवेल किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघ व्यवस्थापनाला न कळवताच गुजरात लायन्सच्या पार्टीला सायकल वरुन गेला होता.
या पार्टीवरुन परत येताना मॅक्सवेल दारुच्या नशेत सायकलवरुन खाली पडला होता. त्यावेळी तो एका मोठ्या गाडीच्या खाली जाता जाता वाचला होता.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “हे प्रकरण वाढू नये म्हणून बीसीसीआयने या प्रकरणावर पडदा टाकत ही बातमी माध्यमापर्यंत पोहचू दिली नाही. माध्यमापर्यंत हे प्रकरण पोहचले असते तर बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात या प्रकरणाचा त्रास झाला असता.”
महत्त्वाच्या बातम्या:
–माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड