चाहते लाईव्ह सामना सुरू असताना मैदानात घुसण्याचे प्रमाण अलिकडच्या काही वर्षात वाढले आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024च्या सहाव्या सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला. आरसीबीने हा सामना 4 विकेट्स राखून जिंकला होता. माजी कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केल्यानंतर सामनावीर पुरस्कार देखील त्यालाच मिळाला. या सामन्यात विराट कोहलीचा एक चाहता खेळपट्टीपर्यंत धावत आला होता. पण सुरक्षारक्षकांनी त्याला पडकून बाहेर नेल्यानंतर या चाहत्याची अवस्था वाईट झाल्याचे समोर येत आहे.
आरसीबी आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आयपीएल 2024च्या 6व्या सामन्यात आमने सामने होते. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत 6 बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य 19.2 षटकात गाठले. विराट कोहलीने याने 49 चेंडूत सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. विराट फलंदाजी करत असतानाच एक चाहता सुरक्षारक्षकांचा घेरा तोडून मैदानात घुसला. त्याने खेळपट्टीवर पोहोचल्याबरोबर विराट कोहली (Virat Kohli) चे पाय धरले आणि मिठी देखील मारली. पण तत्काळ त्याला सुरक्षारक्षकांच्या मदतीने मैदानातून बाहेर केले गेले.
आता या चाहत्याविषयी एक बातमी समोर येत आहे. माहितीनुसार विराटला मिठी मारण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याला या प्रकारानंतर चांगलाच प्रसाद दिला गेला. सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानातून बाहेर आणल्याबरोबर कॅमेऱ्यांपासून दूर नेले. पण कोणा एका चाहत्याने हा व्हिडिओ शूट केलाच. व्हायरल होत असेलल्या व्हिडिओत सुरक्षारक्षक या चाहत्याला लाधा-बुक्क्यांनी मारहान करत आहेत. पोलीस कर्मचारी देखील त्यावेळी उपस्थित असल्याचे व्हिडिओतून पाहायला मिळते.
Security officials beat the guy who hugged Virat Kohli in the RCB vs PBKS match. pic.twitter.com/UrlebhrJGp
— CricketGully (@thecricketgully) March 27, 2024
दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण सुरक्ष रक्षकांचे वर्तन योग्य नसल्याचे म्हणत आहेत. तर काहींच्या मते मैदानात घुसलेल्या चाहत्याला अशाच प्रकारे अद्दल घडवणे योग्य आहे. (Security officials beat the guy who hugged Virat Kohli in the RCB vs PBKS match.)
महत्वाच्या बातम्या –
हैदराबादपुढे सगळे सपाट! 20 षटकात 277 धावा कुटल्या आणि मोडला आरसीबीचा महाविक्रम
IPL 2024 मध्ये हार्दिकचा सलग दुसरा पराभव, 278 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचीही मोठी धावसंख्या