टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवणारे तीन संघ आतापर्यंत ठरले आहेत. हे तीन संघ आहेत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत. तिघेही वेगवेगळ्या गटातून सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं निर्णय घेतला आहे की, टीम इंडिया गट ‘अ’ मध्ये नंबर वन किंवा नंबर दोनवर असली तरी तिला ‘A1’ टीम म्हटलं जाईल. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघासाठी आयसीसीनं ठरवलं आहे की, ऑस्ट्रेलिया ‘ब’ गटात पहिल्या स्थानावर राहिली तरी तिला ‘B2’ म्हटलं जाईल.
आयसीसीच्या या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, 2024 च्या टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलच्या आधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी होणार आहे. याच्या दोन दिवस आधी 24 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात लढत होईल. आयसीसीनं भारत आणि ऑस्ट्रेलियालाच प्राधान्य दिलं आहे. हे इतर कोणत्याही संघासाठी किंवा गटासाठी केलेलं नाही. यामुळे टीम इंडिया उर्वरित दोन सामने कोणत्या संघाविरुद्ध खेळणार हे अद्याप फायनल झालेलं नाही.
टीम इंडियाला A1 म्हटलं आहे. त्यामुळे टीमचा पहिला सुपर 8 सामना C1 विरुद्ध होणार आहे. या गटात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. 20 जून रोजी बार्बाडोस येथे भारतीय संघ ‘क’ गटात अव्वल असलेल्या संघाशी सामना करेल. त्याच वेळी, 22 जून रोजी टीम इंडियाचा दुसरा सुपर 8 सामना D2 संघाशी होईल, जो दक्षिण आफ्रिकेशी नसेल. कारण दक्षिण आफ्रिका ‘ड’ गटात अव्वल स्थानावर राहिल हे निश्चित आहे.
भारताचा सामना बांग्लादेश, नेदरलँड्स, नेपाळ किंवा श्रीलंका यापैकी एका संघाशी होऊ शकतो. मात्र, श्रीलंका या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध बांग्लादेश सामना होण्याची शक्यता जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाद करा, पण विराटचा कुठं! आफ्रिदीचा विक्रम मोडला, आता नंबर धोनीचा
भारताचा विजयी रथ सुरुच! अमेरिकेचा केला 7 विकेट्सनं दारुण पराभव
अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास! हार्दिक पांड्यालाही फायदा, शाकीब अल हसनचं नुकसान