टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मधील नवव्या दिवसाची (३१ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात क्वालिफिकेशन ग्रूप एमध्ये एशियन गेम्समध्ये दोन वेळा पदक जिंकणारी भारतीय ऍथलिट सीमा पुनियानेही भाग घेतला होता. यामध्ये तिने आपले सर्वोत्तम देत ६०.५७ मीटरचा थ्रो केला आणि गुणतालिकेत ६ वा क्रमांक पटकावला.
यादरम्यान पहिल्या प्रयत्नात ती लीगल थ्रो करण्यात अपयशी ठरली होती. जर तो लीगल थ्रो असता, तर त्याने जवळपास ५५ मीटरचे अंतर पार केले असते. (Seema Punia finishes at the sixth position after registering a best throw of 60.57m in her second attempt)
सीमाने दुसऱ्या प्रयत्नात चांगला थ्रो केला. तिने ६०.५७ मीटर थ्रो केला. याहस ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. पहिल्या क्रमांकावर क्रोएशियाची सांद्रा परकोविक आहे. तिने ६३.७५ मीटर थ्रो केला होता.
Discus Thrower Seema Punia is set to begin her journey at #Tokyo2020 in some time. Stay tuned for updates.
Let's wish her all the best with our encouraging messages. #Cheer4India#Athletics #Olympics pic.twitter.com/U1OjxT2KKk
— SAI Media (@Media_SAI) July 30, 2021
तिसऱ्या प्रयत्नात सीमाकडून अपेक्षा होती की, तिचा थ्रो ६० मीटरपेक्षा अधिक असेल. मात्र, तिने निराश केले. तिचा थ्रो ५८.९३ मीटरचा राहिला. यानंतर ती सहाव्या क्रमांकावर घसरली.
डिस्कस थ्रोमध्ये १५ ऍथलिट भाग घेत आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी थ्रोची लांबी ६४ मीटर असली पाहिजे किंवा कमीत कमी १२ सर्वोत्तम ऍथलिट अंतिम फेरीत प्रवेश करतील.
सीमाची कामगिरी
सीमाने एशियन गेम्समध्ये दोन वेळा पदक जिंकले आहे. याव्यतिरिक्त तिने राष्ट्रकुल खेळांमध्येही सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. सीमाचे हे चौथे ऑलिंपिक आहे. यापूर्वी तिने २००४, २०१२ आणि २०१६ ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता. याव्यतिरिक्त या डिस्कस थ्रोमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी भारतीय महिला आहे. राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या कमलप्रीतने ६६.५९ मीटरचा थ्रो केला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना