---Advertisement---

भारत-पाक सामन्यानंतर विरेंद्र सेहवागच्या ‘त्या’ ट्विटमुळे उठले वादळ

On: सोमवार, ऑक्टोबर 25, 2021 5:16 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतावर ऐतिहासिक विजय नोंदवून आयसीसी टी२० विश्वचषक मोहिमेला विजयी सुरुवात केली. भारताने दिलेले १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने नाबाद भागीदारी रचत १० गडी राखून पार करत विजय मिळवला. टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय ठरला. मात्र, यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग एका ट्विटमुळे वादात सापडला आहे.

सेहवागने केले ट्विट
भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर दिल्लीतील काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले. या कारणाने सेहवाग चांगलाच संतापला. त्याने. ट्विट करत लिहिले, ‘दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी असते. मात्र, काल पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर देशातील काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले. अच्छा ते कदाचित क्रिकेटचा विजय साजरा करत असतील. मग दिवाळीत फटाके वाजवून काय नुकसान होणार? अशी दांभिकता का? सगळे ज्ञान त्याचवेळी आठवते का?’

त्याच्या या ट्विटवर अनेकांनी पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी त्याला चुकीचा ठरविले आहे.

भारतीय संघाचा झाला नामुष्कीजनक पराभव
दुबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या व रिषभ पंतच्या ३९ धावांच्या जोरावर १५१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभी केली.

प्रत्युत्तरात, कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने दहा गडी राखून विजय संपादन केला. भारताच्या पहिल्या तीनही फलंदाजांना बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

“टी२० सामन्यातून रोहितला बाहेर करणार? वाद हवेत तर तसं सांगा”, पत्रकराच्या ‘त्या’ प्रश्नाला विराटचे भन्नाट उत्तर

बिग ब्रेकिंग! आयपीएलला मिळाले दोन नवे संघ; ‘या’ कंपन्यांनी जिंकले मालकी हक्क

टी२० विश्वचषक: दोन दिवसांत लागले धक्कादायक निकाल; अशी आहे गुणतालिकेची स्थिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---