श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाला दमदार सुरुवात देणारा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्याचा मानकरी ठरला. त्याच्या धमाकेदार खेळीनंतर भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने एक मजेदार ट्विट केले.
पृथ्वीची धुवाधार सुरुवात
जवळपास ७ महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या युवा सलामीवीर पृथ्वी शॉयाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. कर्णधार शिखर धवनसोबत मिळून त्याने भारताला केवळ ५.३ षटकात ५८ धावांची वेगवान सलामी दिली.
या भागीदारीमध्ये शॉने प्रमुख भूमिका बजावत केवळ २४ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ९ चौकार त्याने लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १७९ असा जबरदस्त राहिला.
सेहवागचे मजेदार ट्विट
पृथ्वीच्या या आक्रमक खेळीनंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एक अत्यंत गमतीदार ट्विट केले. सेहवागचे भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर व वेस्टइंडीज चा माजी कर्णधार ब्रायन लारा यांच्यासोबतचे आपले एक छायाचित्र ट्विट केले. या छायाचित्राला कॅप्शन देताना त्याने लिहिले, ‘पहिल्या ५.३ षटकात आमचा जलवा होता.’ त्याच्या या छायाचित्राला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
Pehle 5.3 overs hamara Jalwa raha. pic.twitter.com/5swBtpOWD9
— Virender Sehwag (@virendersehwag) July 18, 2021
या कारणाने केले असे ट्विट
सेहवागने केलेल्या ट्विट मागे कारण होते की, यापूर्वी रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉ याची तुलना कोण्या एका खेळाडूशी न करता लारा, सचिन आणि सेहवाग या तिन्ही दिग्गजांशी केली होती. त्यावेळी शास्त्रींनी केलेल्या या तुलनेची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे सेहवागने अशा आशयाचे ट्विट केले. पृथ्वी शॉ विजय हजारे ट्रॉफी व त्यानंतर आयपीएल २०२१ पासून अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. आगामी टी२० विश्वचषकात त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला
“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक




