---Advertisement---

सेहवागने निवडले हंगामातील सर्वोत्तम 5 फलंदाज, यादीतून गिल-विराट बाहेर

On: शनिवार, मे 27, 2023 5:02 PM
Virat Kohli Shubman Gill
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार आहे. चाहत्यांमध्ये या सामन्यासाटी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम प्रदर्शन केल्यानंतर या सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले. यावर्षी आयपीएलमध्ये नेहमीपेक्षा फलंदाजांना अधिक फायदा मिळाल्याचे पाहायला मिळाले. अनेक युवा खेळाडूंनीही चाहत्यांची मने जिंकली. अशातच भारतीय संघाचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग याने यावर्षी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या 5 खेळाडूंची निवड केली आहे.

यावर्षी आयपीएलचा 16 वा हंगाम खेळला गेला, ज्यामध्ये शुबमन गिल, फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली या फलंदाजांनी सर्वोत्तम खेळी केली. असे असले तरी, विरेंद्र सेहवागने निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये या तिघांपैकी एकाचेही नाव नाहीये. सेहवागच्या मते त्याने सलामीवीर फलंदाजांना यात निवडणे टाळले आहे.

विरेंद्र सेहवागने एका वृत्तमाध्यवर बोलताना म्हटले की, “आयपीएलच्या या हंगामात माझे वाच फलंदाज पुढीलप्रमाणे आहेत. यात मी सलामीवीर निवडणे टाळले आहे. कारण माझ्या मते सलामीवीरांना धावा करण्यासाठी खूप जास्त संधी मिळतात. माझ्या डोक्यात पहिले नाव आले तो रिंकू सिंग याचे. कारण तुम्ही कधीच अशा एकाद्या फलंदाजाची कल्पना केली नसेल, जो पाच षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देईल. रिंकू सिंगने असे केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर मद्यक्रमातील फलंदाज शिवम दुबे आहे. दुबने यावर्षी 160पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत आणि तब्बल 33 षटकार मारले आहेत. मागचा हंगाम त्याच्याासाठी चांगला गेला नव्हता. पण यावर्षी तो एकदम साफ मानसिकतेसह आला आणि त्याने षटकार ठोकले.”

“मी तिसऱ्या क्रमांकवर एक सलामीवीर निवडला आहे. मला याचे नाव घ्यावेच लागले. कारण त्याने तितकी दमदार फलंदाजी केली आहे. हा दुसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. त्यानंतर सूर्यकुमारचे नाव येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद होत होता, पण आयपीएल 2023मध्ये सूर्याने तुफान फलंदाजी केली आहे. या यादीत शेवटच्या क्रमांकावर मी हेनरिक क्लासेनला निवडले आहे. क्लासेनने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मध्यक्रमात दमदार फलंदाजी केली आहे. एका सामन्यात त्याने शतकही ठोकले. फिरकी गोलंदाजीवर खूप कमी विदेशी खेळाडूंना धावा करता येतात,” असे सेहवाग पुढे म्हणाला. सेहवागने या यादीत गिल, डू प्लेसिस आणि विराटची निवड केली नसली, तरी या तिघांनी हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुबमन गिलने ऑरेंज कॅप जवळपास आपल्या नावावर केली आहे. (Sehwag picks the best 5 batsmen of the season, leaving Gill-Virat off the list)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल हंगामातून बाहेर पडल्यानंतर मुंबईला आठवला जसप्रीत बुमराह; आर्चरचं नाव घेत प्रशिक्षक म्हणाले…  
सामना गमावूनही सूर्यकुमारने मन जिंकले! सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---