भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. विराटने नोव्हेंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावलेले. त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. भारतीय कर्णधाराचा सध्याचा फॉर्म आजकाल चर्चेचा विषय बनला आहे. सर्व दिग्गज खेळाडू त्यावर आपले मत देत आहेत. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावातही कोहली चांगल्या प्रारंभाचा फायदा घेण्यात अपयशी ठरला आणि ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर आता भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराटची मजा घेतली आहे.
त्या घटनेच्या आधारे घेतली विराटची मजा
सेहवाग निवृत्त झाल्यानंतर समालोचनासह सातत्याने सोशल मीडियावर गमतीदार पोस्ट करत असतो. त्याने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली ज्यामध्ये तो भारतीय कर्णधार विराट कोहलीची मजा घेताना दिसला. सेहवागने आपल्या ट्विटर हँडलवरून एक छायाचित्र शेअर केले. ज्यामध्ये परीक्षेत ९९.९९ व ९९.९७ टक्के गुण मिळवूनही निराश झालेले दोन विद्यार्थी पुन्हा परीक्षा देणार असल्याचे लिहिले आहे.
या पोस्टला कॅप्शन देताना सेहवागने लिहिले, ‘अशा पद्धतीने तर विराटलाही शतक हवेसे वाटत नसेल.’ अशाप्रकारे सेहवागने विराटचे शतक न होण्याची अप्रत्यक्षरीत्या मजा घेतली.
Itni badly 100 toh shayad Kohli ne bhi nahi chahaya hoga. pic.twitter.com/30YPfsnds2
— Virender Sehwag (@virendersehwag) August 13, 2021
शतक ठोकण्यात अपयशी ठरत आहे विराट
विराट कोहली नोव्हेंबर २०१९ पासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. बांगलादेश विरुद्ध कोलकाता कसोटीत त्याने हे शतक झळकावलेले. तेव्हापासून आजतागायत तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करू शकला नाही. सध्या विराटच्या नावे ७० आंतरराष्ट्रीय शतके असून तो, सर्वाधिक शतके ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (१०० शतके) व रिकी पॉंटिंग (७१ शतके) हे दोन दिग्गज आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जो रूट ऑन फायर! लॉर्ड्सवर शतक ठोकत ‘असा’ पराक्रम करणारा बनला जगातील सहावा कर्णधार