---Advertisement---

तिसऱ्या टी२० सामन्यात सॅमसनच्या जागी ‘या’ खेळाडूला द्यावे संघात स्थान, सेहवागचा सल्ला

On: मंगळवार, डिसेंबर 8, 2020 11:26 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील अखेरचा टी20 सामना मंगळवारी (8 डिसेंबर) सिडनी येथे खेळला जाईल. या सामन्याआधी माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

मनीष पांडेला संघात द्यावे स्थान- सेहवाग

राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज संजू सॅमसन टी20 मालिकेत आतापर्यंत चांगली खेळी करू शकलेला नाही. कर्णधार विराट कोहलीने विजयी फॉर्म्युल्यामध्ये बदल करू नये, असे सेहवागला वाटते. परंतु युवा फलंदाज मनीष पांडेला संघात स्थान द्यावे, असा त्याचा विश्वास आहे.

सेहवाग सोनी सिक्स या क्रीडा वाहिनीशी बोलताना म्हणाला की, “मला असे वाटत नाही की, तिसऱ्या टी20 सामन्यात संघात कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता आहे, परंतु जर मनीष पांडे तंदुरुस्त असेल, तर त्याला संघात स्थान द्यावे. संजू सॅमसनच्या जागी त्याला संधी मिळू शकेल. सॅमसनने दोन सामन्यांत धावा केल्या नाहीत. विराटला संघात बदल करण्याची सवय आहे.”

पहिल्या टी20 सामन्यात पांडे 2 धावा करून परतला तंबूत

कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात मनीष पांडेला संधी मिळाली होती. परंतु या सामन्यात तो केवळ 2 धावा करून बाद झाला होता.

संजू सॅमसन ठरला ‘फ्लॉप’

संजू सॅमसनला दोन्ही टी20 सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. पण त्यालाही विशेष प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या टी20 सामन्यात त्याने 23 धावांची खेळी केली, तर दुसर्‍या टी20 सामन्यात तो 15 धावा करून बाद झाला.

पांडेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक

पांडे दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाचा भाग आहे. 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर 104 धावांची नाबाद खेळी केली होती. आतापर्यंत 39 टी20 सामने खेळणार्‍या पांडेने दोन अर्धशतकांसह अवघ्या 709 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ

भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…

ट्रेंडिंग लेख-

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---