---Advertisement---

आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

On: गुरूवार, जुलै 22, 2021 3:09 PM
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघासोबत तीन दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ३११ धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ५६ धावांवर ४ फलंदाजांना माघारी धाडले होते. एकीकडे काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघातील फलंदाज संघर्ष करत होते, तर दुसरीकडे याच संघातील एका फलंदाजाने अप्रतिम खेळी करत शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे त्याची राष्ट्रीय संघात निवडही झाली आहे.

भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघातील फलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते. परंतु, याच संघातील सलामी फलंदाज हसीब हमीद याने टीचून फलंदाजी करत शतक झळकावले आहे. तो ही शतकी खेळी करत असतानाच त्याची आगामी भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.

त्याने सराव सामन्यात फलंदाजी करताना २२८ चेंडूंचा सामना करत ११२ धावांची खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो बाद होऊन माघारी परतला.

तब्बल ५ वर्षानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन
इंग्लंड क्रिकेट बोर्डने ४ ऑगस्टपासून भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी (२२ जुलै) संघाची घोषणा केली आहे. या संघात हसीब हमीद याला देखील संधी देण्यात आली आहे. हसीबने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना देखील भारतीय संघाविरुद्ध २०१६ साली खेळला होता. त्यानंतर तो संघातून बाहेर पडला. पण गेल्या काही महिन्यांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करताना निवडकर्त्यांना खूश केले आहे. (Select county eleven hameed hits hundred picks for test series against india)

हसीब हमीदची कारकीर्द
हसीब हमीदच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर,त्याने आतापर्यंत एकूण ३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४३.८ च्या सरासरीने २१९ धावा केल्या आहेत. यामध्ये ८२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: थ्री इडियट्स सिनेमात कुणी काम केलंय; भारतीय क्रिकेटपटूंची उत्तरं ऐकून तुम्हीही म्हणालं, ‘भावांनो आता बास!’

समालोचन करताना ‘मी ब्राम्हण आहे’ म्हणत सुरेश रैनाने दिले नव्या वादाला आमंत्रण; सोशल मीडियामधून उठली टीकेची झोड

खुशखबर! कोरोनाला धोबी पछाड देत रिषभ पंत टीम इंडियात दाखल; फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---