---Advertisement---

Video: थ्री इडियट्स सिनेमात कुणी काम केलंय; भारतीय क्रिकेटपटूंची उत्तरं ऐकून तुम्हीही म्हणालं, ‘भावांनो आता बास!’

---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्वातील युवा भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ मजामस्ती करताना दिसून आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व खेळाडू अनेक प्रश्नांची चुकीचे उत्तर देताना दिसत आहेत.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्याने भारतीय संघ मालिकेत पुढारला आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (२३ जुलै) कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी, भारतीय संघ सरावातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर मजामस्ती करताना दिसून आला. या मस्तीचा एक व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवरून शेअर केला आहे.

खेळाडूंनी दिली खोटी उत्तरे
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व भारतीय खेळाडू विचारलेल्या प्रश्नांची खोटी उत्तरे देताना दिसून आले. फिरकीपटू कुलदीप यादव याने आपले नाव राहुल असल्याचे म्हटले. तर, देवदत्त पडिक्कलने स्वतःला रॉजर फेडरर म्हटले. संघातील सर्वात मस्तीखोर खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंड्या बंधूंनी थ्री इडियट्स चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्यांऐवजी स्वतःसह मुंबई इंडियन्स संघातील आपला साथीदार वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डचे नाव घेतले. फलंदाज सूर्यकुमार यादवने एलबीडब्लूचा अर्थ लव्ह बिफोर असा सांगितला. तसेच, इतर अनेक प्रश्नांची उत्तरे अत्यंत वेगवेगळी दिली.

भारताने मिळवला आहे मालिका विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असल्याने शिखर धवनच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. त्यानंतर, भारतीय संघ तीन सामन्यांची टी२० मालिका खेळेल. भारताचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड हे प्रथमच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

समालोचन करताना ‘मी ब्राम्हण आहे’ म्हणत सुरेश रैनाने दिले नव्या वादाला आमंत्रण; सोशल मीडियामधून उठली टीकेची झोड

खुशखबर! कोरोनाला धोबी पछाड देत रिषभ पंत टीम इंडियात दाखल; फोटो व्हायरल

दांडीगुल गोलंदाजीचा शेर! क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज बनलेला ‘ट्रेंट बोल्ट’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---