वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेनंतर भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिकाही या दौऱ्यात खेळायची आहे. 3 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी (5 जुलै) भारतीय संघ घोषित केला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असून संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. असे असले तरी भारतीय संघात निवड होईल अशी सर्वाधिक चर्चा झालेल्या रिंकू सिंग व जितेश शर्मा यांच्याकडे निवड समितीने दुर्लक्ष केले.
आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर रिंकू सिंग व जितेश शर्मा यांना या मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांच्याबरोबरच ऋतुराज गायकवाड याला देखील निवड समिती आणखी एक संधी देऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, निवड समितीने यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांना प्रथमच भारतीय टी20 संघात सामील होण्याची संधी दिली. तर, यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन आपली जागा राखण्यात यशस्वी ठरला.
जितेश शर्मा याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 156 पेक्षा जास्तच्या सरासरीने 309 धावा केल्या होत्या. त्याने अनेक सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचे देखील कामगिरी करून दाखवली. दुसरीकडे, रिंकू सिंग याने या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. केकेआरसाठी खेळताना त्याने फिनिशर म्हणून भूमिका बजावताना एकहाती सामने जिंकून दिले. गुजरातविरुद्ध सलग 5 षटकार मारत त्याने संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. तर, ऋतुराज गायकवाडने 500 पेक्षा अधिक धावा करून चेन्नईला आयपीएल विजेते बनवण्यात सिंहाचा वाटा उचललेला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
(Selection Committee Ignored Rinku Singh Ruturaj Gaikwad And Jitesh Sharma For West Indies Tour T20I)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद