4 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ घोषित करण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मनगटाच्या दुखापतीमुळे निवड समितीला वाट पाहवी लागणार आहे.
बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की “विराटला सध्या मनगटाची दुखापत झाली आहे. संघ तयार आहे फक्त निवड समिती सदस्य राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सपोर्ट स्टाफकडून वैद्यकीय माहिती येण्याची वाट पाहत आहेत.”
“त्याला ही दुखापत कशी झाली याबद्दल खात्रीशीर माहिती नाही. कदाचीत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान किंवा सरावादरम्यान ही दुखापत झाली असण्याची शक्यता आहे.”
जर विराटची दुखापत गंभीर नसेल तर निवड समिती दोन्ही कसोटी सामन्यासाठी संघ जाहिर करेल. किंवा फक्त एका सामन्यासाठी संघ जाहिर करतील. हा संघ शनिवारी किंवा रविवारी जाहिर होईल.
तसेच सुत्रांच्या नुसार निवड समिती जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती देणार आहे. बुमराह हा इंग्लड दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीपासून कायम खेळत आहे.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की “जसप्रीतने इंग्लंडमध्ये तीन कसोटीत 133 षटके गोलंदाजी केली आहे. तसेच एशिया कपमध्ये दुबईच्या उष्णतेतही गोलंदाजी केली असल्याने आणि पुढचा आॅस्ट्रेलिया दौरा पाहता त्याला थोड्या विश्रांतीची गरज आहे. त्याप्रमाणेच भुवीलाही विश्रांतीची गरज आहे.”
त्याचबरोबर भारतीय संघासाठी आर आश्विनने फिटनेस टेस्ट यशस्वी पार केल्याने तो निवडीसाठी उपलब्ध आहे.
त्याचबरोबर शिखर धवनला संघातून वगळाणार असल्याचेही वृत्त असून पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवालला संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
–भारत-बांगलादेश अंतिम सामन्याची तिकिटे नाराज पाकिस्तानी चाहत्यांनी विकली
–कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो
–टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही