पुणे। महाराष्ट्राने ३९वी वरिष्ठ आणि २३वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दोन हजार मीटरमध्ये आठ जणांच्या कॉक्सलेसमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.
रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिशनच्या सहयोगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संघाने ६ मिनिटे १२.१ सेकंद वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या संघात विपूल घुरडे, सागर घुगे, ओंकार म्हस्के, विकास, अखिल चंद्रन, संतोष उमप, आर. राजकुमार, लेकराम, धनंजय पांडे यांचा समावेश आहे. सर्व्हिसेसच्या संघाने ६ मिनिटे ०९.६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर आर्मीच्या संघाने ६ मिनिटे ११.३ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. याआधी महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने सिंगल स्कल्समध्ये ब्राँझपदकाची कमाई केली आहे.
ओडिसाला तीन सुवर्णपदके
ओडिसाच्या ५०० मीटरमध्ये वर्चस्व राखून सर्व्हिसेसच्या खेळाडूंसमोर आव्हान निर्माण केले. ओडिसाने मिश्र दुहेरी सिंगल स्कल्स, महिला दुहेरी कॉक्सलेस आणि महिला फोर कॉक्सलेसमध्ये सुवर्णयश मिळवले. पुरुष दुहेरी सिंगल स्कल्समध्ये ओडिसाने एका ब्राँझपदकाची कमाई केली.
निकाल –
५०० मीटर – पुरुष एकेरी सिंगल स्कल्स – के. नारायण (१ मि. ५६.४७ से., सर्व्हिसेस), विजित व्ही. (१ मि. ५७.५४ से., केरळ), कुलदीपसिंग (२ मि.,०३.३२ से., हरियाणा).
पुरुष दुहेरी सिंगल स्कल्स – दुष्यंत – सुखमीतसिंग (१ मि. ३२.४२ से., आर्मी), अर्जुन लाल जाट – रवी (१ मि. ३३.१७ से., सर्व्हिसेस), करनबीरसिंग – भिंदर (१ मि. ३३.२९ से., ओडिसा).
पुरुष दुहेरी कॉक्सलेस – पुनीतकुमार – गुरमीतसिंग (१ मि. ३२.०८ से, सर्व्हिसेस), अक्षत -चरणजितसिंग (१ मि. ३४.२१ से., आर्मी), मनमोहन – विकास यादव (१ मि. ३५.८४ से., मध्य प्रदेश).
मिश्र सिंगल स्कल्स – शागणदीप सिंग – संजुक्ता डुंग (१ मि. ४०.९५ से., ओडिसा), निजील पी.एम. – जी. गीतांजली (१ मि. ४३.८५ से., तेलंगण), मंगल सिंग – मोनिका भदोरिया (१ मि. ४३.९५ से., मध्य प्रदेश).
महिला दुहेरी कॉक्सलेस – सोनाली स्वैन – रितू कुडी (१ मि. ५५.०२ से., ओडिसा), ज्योती कुश्वाहा -रुक्मणी डांगी (१ मि. ५९.३२ से., मध्य प्रदेश), फातीशुभा के. -ज्योतिका बी. (२ मि. १२.४० से., तमिळनाडू).
कॉक्सलेस फोर – ओडिसा (१ मि. ४३.२१ से.), केरळ (१ मि. ४७.३९ से.), हरियाणा (१ मि. ४८.४५ से.).
महत्त्वाच्या बातम्या –
वरिष्ठ आणि खुली राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक
Memories 2021| टोकियो ऑलिम्पिक! भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा