---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंनी केली वार्षिक कराराची मागणी

On: गुरूवार, जून 3, 2021 4:04 PM
Jaydev Unadkat
---Advertisement---

जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका हा क्रीडाक्षेत्राला बसत आहे. अनेक महत्त्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या गेल्या आहेत. याच कारणाने भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा हंगाम देखील सलग दुसऱ्या वर्षी रद्द होऊ शकतो. त्यामुळे देशभरातील सर्व राज्य संघटनेशी संलग्न असलेल्या खेळाडूंच्या उपजीविकेचा प्रश्न पुढे आला आहे. राष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे राज्य संघटनेच्या खेळाडूंना देखील करारबद्ध करून त्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी काही वरिष्ठ खेळाडूंनी केली आहे.

खेळाडूंची होते या मार्गाने कमाई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दरवर्षी राष्ट्रीय संघातील खेळाडूंना करारबद्ध करत असते. त्यामुळे या खेळाडूंना सामने न खेळता देखील मानधन देण्यात येते. दुसरीकडे राज्य संघटनेचे खेळाडू पूर्णपणे सामना शुक्लावर अवलंबून असतात. काही मोजक्या खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही चांगली नोकरी नसते. सध्या क्रिकेट हंगाम बंद असल्याने या खेळाडूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वरिष्ठ खेळाडूंनी केली मागणी
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वच खेळाडू आयपीएल संघांचा भाग नसतात किंवा त्यांना चांगली नोकरी नसते. अशा खेळाडूंबाबत बोलताना सौराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार आणि भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने म्हटले की, “कोरोनापूर्वी खेळाडूंना करारबद्ध करण्याविषयी बातम्या पुढे येत होत्या. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वच खेळाडूंना करारबद्ध करता येणार नाही. मात्र, प्रत्येक संघटनेच्या ३० खेळाडूंना करार व इतर युवा खेळाडूंना काहीसे मानधन दिल्यास ते प्रेरित राहतील.”

छत्तीसगड संघाचा कर्णधार व अनुभवी अष्टपैलू हरप्रीत भाटिया हा दरवर्षी काही काळ क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जातो. खेळाडूंचा कराराविषयी बोलताना तो म्हणाला, “गत हंगामात मी मर्यादित षटकांचे १० सामने खेळलो. मात्र याद्वारे मिळालेली रक्कम पुरेशी नाही. मला आपल्या कुटुंबाचा व इतरांचा विचार करता पैसे मिळविण्यासाठी इंग्लंडला जावे लागते. खेळाडूंना करार मिळाले तर, माझ्यासारखे अनेक खेळाडू इथेच राहतील. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होतात व संपूर्ण हंगाम खेळू शकत नाहीत, त्यांचा विचार कोण करणार?”

उनाडकट व भाटिया यांचाच मुद्दा सौराष्ट्राच्या अनुभवी शेल्डन जॅक्सन यानेही मांडला. संपूर्ण घरगुती हंगाम खेळणारा प्रत्येक खेळाडू १० लाख पेक्षा अधिक रक्कम कमावतो. मात्र, जवळपास दोन हंगाम क्रिकेट न झाल्याने खेळाडू हवालदिल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणता नियम म्हणतो ३० नंतर भारतीय संघात निवड होत नाही,’ ३४ वर्षीय यष्टीरक्षक भडकला

डेविड वॉर्नरने शेअर केला आयपीएल २०२१ मधील ‘त्या’ भावूक क्षणाचा फोटो; म्हणाला, ‘द्या कॅप्शन’

व्वा रं पठ्ठ्या! ‘गांगुली’सोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या ‘या’ खेळाडूनेच मोडला ‘दादा’चा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---