---Advertisement---

दोन देशांकडून खेळलेल्या या खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

On: शुक्रवार, मे 25, 2018 6:13 PM
---Advertisement---

बुधवारी एबी डीविलिअर्सने निवृत्तीचा निर्णय घोषित करत सर्वांना धक्का दिला. या धक्यातून सावरत असतानाच गुरवारी आर्यलंडचा महान क्रिकेटपटू एड जॉयसनेही आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

याबद्दल जॉयसने क्रिकेट आर्यलंडला सांगितले, “मला वाटते की खेळणे थांबवून नवीन अध्याय सुरू करण्याची हिच योग्य वेळ आहे. नुकताच पार पडलेला सामना माझ्यासाठी अविश्वसनीय होता. माझा व्यावसायिक क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असल्याने तो उत्तम सामना होता.”

या ३९ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय कारकिर्दित ७८ वनडे १८ टी २० आणि एकमेव कसोटी सामना खेळला.

त्याने २००७ च्या विश्वचषकासाठी आर्यलंडला पात्र ठरवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. मात्र त्यानंतर त्याने या विश्वचषकासाठी इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

त्याने २००६-०७ च्या दरम्यान १७ वनडे सामन्यात २७.७० च्या सरासरीने ४७१ धावा केल्या. २०११ ला परत तो आर्यलंडकडून खेळायला आला.

जॉयसने कारकिर्दित तीन वनडे विश्वचषक खेळले. त्यातील २००७ चा विश्वचषक इंग्लंडकडून, तर २०११ आणि २०१५ चा विश्वचषक तो आर्यलंडकडून खेळला.

या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाने क्रिकेट कारकिर्दित ७८ वनडे सामन्यात ३८ च्या सरासरीने २६२२ धावा केल्या. नाबाद १६० धावा ही अफगानिस्तान विरूध्दची २०१६ मधील त्याची सर्वाच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वनडेत त्याच्या नावावर ६ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

जॉयसने १८ टी२० सामन्यांत ४०५ धावा केल्या. यात २०१२ मध्ये स्कॉटलंडविरूध्द केलेल्या ५८ चेंडूत ७८ धावा ही त्याची सर्वाच्च खेळी आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५५ सामन्यात ४७.९७ च्या सरासरीने १८,४६५ धावा केल्या. यात ४७ शतकांचा समावेश आहे.

जॉयसने मेरिलेबोन क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो मिडलसेक्स, ससेक्स या संघांकडून १६ वर्षे काउंटी क्रिकेट खेळला आहे.

“काउंटी क्रिकेटमुळे मला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळाली. काउंटी क्रिकेट हा माझ्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मला नवीन मित्र मिळाले”, असे तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर विराट कोहली म्हणाला सॉरी

ते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी नक्की काय झाले?

ती वस्तु घेऊन मैदानात जायचे नाही, आयसीसीचे पाकिस्तानला खडे बोल

श्रीलंकन खेळाडूच्या वडीलांची हत्या, वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार

एबी आधी ५ वर्ष आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ५ खेळाडू आजही खेळत आहे क्रिकेट

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment