पाकिस्तानविरुद्ध भारताची धावसंख्या 4 बाद 66 असताना हार्दिक पंड्या खेळपट्टीवर आला. पाचव्या विकेटसाठी त्याने ईशान किशन सोबत शतकी भागीदारी केली. संघ अडचणीत अशताना ईशान किशन आणि हार्दिकची ही खेळी महत्वपूर्ण ठरली. ईशान किशनने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हार्दिकने देखील वनडे कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक केले.
शनिवारी (2 सप्टेंबर) भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आशिया चषक अभियान सुरू केले. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची वरची फळी अपेक्षित धावा करू शकली नाही. पण पाचव्या विकेटसाठी ईशान किशन आणि हार्दिक पंड्या () यांनी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. हार्दिकने 62 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 50 धावांचा टप्पा पार केला. (SENSATIONAL HARDIK PANDYA…!! Fifty in 62 balls with 3 fours )
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
फॉर्म खरंच गेलाय! मागील 18 वनडेत गिलची बॅट थंडावलेलीच, धक्कादायक आकडेवारी समोर
अर्रर्र! पाकिस्तानी गोलंदाजापुढे लागला नाही गिलचा टिकाव, धावांपेक्षा तिप्पट चेंडू खेळून परतला तंबूत