१४ मे ते २० मे दरम्यान होणाऱ्या इटालियन ओपन (रोम मास्टर्स) स्पर्धेतून सेरेना विल्यम्सने माघार घेतली आहे. यापुर्वी तीने माद्रिद ओपनमधूनही माघार घेतली होती. त्यामुळे ३ वेळची फ्रेंच ओपन विजेती सेरेना या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतूनही माघार घेणार असल्याच बोललं जात आहे.
इटालियन ओपन नंतर बरोबर १ आठवड्याने फ्रेंच ओपन स्पर्धा होणार आहे. तीने ६ ते १३ मे दरम्यान होत असलेल्या माद्रिद ओपनमधून सुरुवातीला तर १४ मे ते २० मे दरम्यान होणाऱ्या इटालियन ओपन आता माघार घेतली आहे.
२१ मार्च ते १ एप्रिल २०१८ दरम्यान झालेल्या मियामी ओपन स्पर्धेत तीला पहिल्याच फेरीत पराभवला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ती टेनीस खेळलेली नाही.
यावेळेची फ्रेंच ओपन २७ मे ते १० जून या काळात होणार आहे. इटालियन ओपन आणि माद्रिद ओपन या मोठ्या स्पर्धा असुन त्या लाल मातीवरील ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणुन खेळाडू पहातात.
सेरेनाचा सध्याचा फिटनेसमुळेतिला या स्पर्धेतून माघार घ्यायला लावणार असे दिसते.
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही
–सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!








