इटलीच्या सेरी ए चा चॅम्पियन असेलेला जुवेंटसने परमाला २-१ असे पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. मात्र स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला जुवेंटससाठी अजून एकही गोल करता आला नाही.
रोनाल्डो हा जुवेंटसकडून तिसरा सामना खेळला या तीनही सामन्यात त्याचे गोलचे खाते शुन्यच आहे. परमा विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने आठ शॉट्स खेळले यातील एकही गोल झाला नाही.
रोनाल्डोचा नवा विक्रम
३३ वर्षीय रोनाल्डोने गोल करण्याचा २३ वेळा प्रयत्न केला हा युरोपच्या पाच महत्त्वाच्या लीगमधील सर्वाधिक खराब विक्रम आहे. पहिला गोल करण्यासाठीच्या यादीत रोनाल्डो पहिल्या, नॅनटेस मिडफिल्डर वॅलेनटीन रोइंगर १५ प्रयत्नांसह दुसऱ्या तर क्रिसल पॅलेसचा स्ट्रायकर क्रिस्टन बेनटेक १३ प्रयत्नांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
“तो एक उत्कृष्ठ खेळाडू असून नक्कीच त्याला गोल करण्यात यश येईल. तसेच संघाला त्याची गरज आहे”, असे जुवेंटसचा मिडफिल्डर ब्लेअस माटुडी म्हणाला. त्याने या सामन्यात ५८व्या मिनिटाला गोल केला.
तसेच मारियो मॅंडझुकीचने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. त्याने तीन सामन्यात दोन गोल केले असून एक असिस्ट केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक
–रहाणे, एबी आणि सचिनबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य