क्रिकेटमध्ये अनेकवेळा तुम्ही मॅच फिक्स झालेल्या घटना ऐकल्या असतील. तसेच मॅच फिक्सिंगमुळे अनेकदा काही खेळाडूंना गंभीर शिक्षाही भोगावी लागली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे गंभीर आरोप होतात तेव्हा तेव्हा सगळीकडे खळबळ उडते. कारण यामुळे क्रिकेटच्या प्रामाणिक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतो. सध्या आता असाच एक गंभीर आरोप भारतीय क्रिकेटपटूने केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत बंगालचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये अनेक फ्रेंचायजींचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीवत्स गोस्वामीने मॅच फिक्सिंगचे आरोप करत बंगाल क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेट असोसिएशने ऑफ बंगालच्या पहिल्या डिव्हिजन लीगमध्ये दोन क्लबमधील सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा गोस्वामी केला आहे. तसेच श्रीवत्स गोस्वामी 2008 अंडर 19 वर्ल्डकप संघाचा सदस्य देखील होता.
याबरोबरच श्रीवत्सने आपल्या फेसबुक पेजवर मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने मोहम्मडन स्पोर्टिंगच्या खेळाडूंवर गंभीर आरोप केला आहे. टाऊन क्लबला विजय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक आऊट होत होते असे सांगितलं आहे. या गंभीर आरोपानंतर क्रिकेट मंडळ यामुळे खळबळून जागं झालं आहे.
तसेच श्रीवत्स गोस्वामीने लिहिलं आहे की, “मला हे सर्व पाहून लाज वाटते की हा खेळ मी खेळलो जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. मला क्रिकेट आवडतं आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडतं. पण हे सर्व पाहून माझं मन दुखावलं आहे. क्लब क्रिकेट, बंगाल क्रिकेटचं हृदय आणि आत्म आहे. कृपया त्याचं नुकसान करू नका. मला वाटतं की मी क्रिकेटला जागवण्याचं काम केलं आहे. आता मीडिया कुठे आहे?”
दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामी याने 2009 ते 2022 दरम्यान बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तर श्रीवत्स गोस्वामीने 2022 पासून मिझोरमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून श्रीवत्सने 61 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 32.46 च्या सरासरीने 3019 धावा केल्या आहेत. तसेच श्रीवत्सने 4 शतकं आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : घ्या जाणून भारतीय संघाचा धर्मशाला स्टेडियममध्ये कसा आहे रेकॉर्ड? कोण मारेल बाजी, वाचा सविस्तर
- NZ Vs AUS : अबब..! न्यूझीलंड संघाने एकाच डावात टाकले इतके वाईड बॉल, अन् नावावर केला नकोसा विक्रम