न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना हा वेलिंग्टन येथे सुरू आहे. पहिल्या डावात यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वाईड बॉलचा विक्रम आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये वाईड बॉल टाकणं हा एकप्रकारे मोठा गुन्हा आहे. कसोटीत वाईड बॉलचे नियम तसे फार कडक नाहीत. पण वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये लेग साईडला चेंडू थोडा जरी बाहेर जात असला तरी वाईड दिला जातो. त्यामुळे पहिल्या डावात तब्बल 20 वाईड बॉल टाकणाऱ्या न्यूझीलंडने एक अप्रिय विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
याबरोबरच, कॅमेरून ग्रीनच्या नाबाद 103 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बाद 89 धावा अशी अवस्था झाली असताना ग्रीन याने 16 चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी साजरी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेरीस नऊ बाद 279 धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 10 गडी गमावून 383 धावा केल्या आहेत.
यामध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने 174 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. तर यावेळी त्याच्या बॅटमधून 23 चौकार आणि 5 षटकारही निघाले होते. तर दुसरीकडे किवी गोलंदाजांनीही वाईड चेंडू टाकत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवण्यात हात भार लावला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 20 वाईड चेंडू टाकले आहेत.
अशातच न्यूझीलंड संघाने कसोटी सामन्याच्या एका डावात 20 वाईड चेंडू टाकत मोठा विक्रम केला आहे. तर कसोटी डावात सर्वाधिक वाईड चेंडू टाकणारा न्यूझीलंड हा तिसरा संघ ठरला आहे. त्याआधी वेस्ट इंडिज संघाने कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक वाइड चेंडू टाकले होते. तर 12 जून 2008 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात त्याने 21 वाईड बॉल टाकले. या काळात वेस्ट इंडिज संघाने 8 नो बॉलही टाकले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजने एकूण 36 धावा अतिरिक्त धावा दिल्या होत्या. याशिवाय इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात २१ वाइड टाकले होते. तर 1 नोव्हेंबर 2019 पासून खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात त्याने 21 वाईड बॉल टाकले. या कालावधीत इंग्लंड संघाने एकूण 54 अतिरिक्त धावा दिल्या होत्या.
A terrific bowling performance from Australia helps them gain a huge first-innings lead 🔥#WTC25 | #NZvAUS 📝: https://t.co/Sr6NUihsjM pic.twitter.com/3YhZ0lWMRx
— ICC (@ICC) March 1, 2024
दरम्यान, न्यूझीलंडचा संघ आता या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात किवी संघाने हा नकोसा विक्रम केला आहे. या काळात किवी संघाने 3 नो बॉलही टाकले आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्या मिळून 41 अतिरिक्त धावा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –