भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा 7 मार्चपासून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. तर या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघाचा अपडेटेड स्क्वाड जाहीर केला आहे.
याबरोबरच धर्मशालाचे स्टेडियम हे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळेस ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. तसेच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तर भारताने याआधीच कसोटी मालिका जिंकली आहे. याबरोबरच भारतीय संघ त्याचा दुसरा कसोटी सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळणार आहे.
याआधी भारतीय संघाने 7 वर्षांपूर्वी धर्मशालाच्या मैदानावर कसोटी सामना खेळला होता. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. तर या सामन्यात भारतीय संघाने हा निर्णायक कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला होता. तसेच कसोटी मालिका देखील 2-1 ने जिंकली होती. तर या सामन्यात रवींद्र जडेजाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हां भारतीय संघ आता 7 वर्षांनंतर धर्मशालाच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे.
दरम्यान, धर्मशाला मैदानाची खेळपट्टी काळ्या मातीची असून खेळपट्टीवर ओलावा असल्यामुळे त्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. तसेच धरमशालामध्ये कमी तापमानामुळे खेळपट्टीवर दीर्घकाळ ओलावा राहण्याची शक्यता आहे. तर या कसोटी सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच या मैदानावर 7 वर्षांपूर्वी मार्चमध्येच कसोटी सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर फिरकी गोलंदाजांनी 18 विकेट्स घेतल्या होत्या.
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
महत्वाच्या बातम्या –
- NZ Vs AUS : अबब..! न्यूझीलंड संघाने एकाच डावात टाकले इतके वाईड बॉल, अन् नावावर केला नकोसा विक्रम
- NZ vs AUS : अर्रर्र..! केन विल्यमसन 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच झाला कसोटीत असा धावबाद, पाहा व्हिडिओ