पुणे: सिटी स्पोर्टस एरेना येथे सुरु असलेल्या सेव्हन अ साईड सिटी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत निरागस नाईटस आणि नक्षत्र चिताज संघांनी चमकदार विजयांसह गुण तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. स्पोर्टस फाऊंडेशन, पुणेच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील ९ वर्षांखालील वयोगटात निरागस नाईटसने अपराजित्व कायम राखले. त्यांनी दोन सामन्यात १ विजय मिळविला, तर एका सामन्यात बरोबरी पत्करली आहे. पहिल्या सामन्यात नाईट्सने डायमंड ड्रॅगर्सला ३-३ असे बरोबरीत रोखले. नाईटसाठी युझरसिफ शेखने दोन, तर आराध्य पाटीलने एक गोल केला. डायमंडस संघासाठी अनुज शिरोटेने तीनही गोल केले. त्यानंतर युझरसीफच्या एकमात्र गोलच्या जोरावर नाईटसने मॅट्रिक मार्व्हल्सचा १-० असा पराभव केला.
११ वर्षांखालील गटात तारामंडल चीता आणि निरागस नाईटस यांचे समान गुण झाले. नाईटसने नक्षत्र चिताज संघाचा १-० असा पराभव केला. मात्र, नाईटसला नंतर जीएनएस गनर्सकडून ०-१ अशा पराभवाचा सामना कारावा लागला. तारामंडळ चीताजला दुसऱ्या सामन्यात गोल्डन गार्डियन्सविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
१५ वर्षांखालील गटात नक्षत्र चिताज संघाने सलग दोन विजयासह आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी प्रथम जीएनएस गनर्सचा ४-० आणि दुसऱ्या सामन्यात मॅट्रिक मार्व्हल्सचा २-० असा पराभव केला.
१३ वर्षांखालील गटात सक्सेस स्ट्रायकर्सने देखील सलग दोन विजय मिळविले. पहिल्या सामन्यात त्यांनी आदित्य ऑलस्टार्सचा ७-१ असा पराभव केला. त्यानंतर ज्योती जग्वार्सला ४-० असे पराभूत केले.
निकाल –
9 वर्षांखालील : निरागस नाइट्स: ३ (युझरसीफ शेख ३, १६वे मिनिट, आराध्या पाटील ७वे मिनिट) अनिर्णित वि. डायमंड ड्रॅगर्स ३ (अनुज शिरोटे ६, १२, १७वे मिनिटा); निरागस नाइट्स : १ (युझरसिफ शेख ६वे मिनिट,) वि.वि. मॅट्रिक मार्व्हल्स ०; डायमंड ड्रॅगर्स : ३ (अनुज शिरोटे ५, १०, १७वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : ०; मॅट्रिक मार्व्हल्सः ५ (माधवन ६, १५वे मिनिट, अंश धकाते ११, १६, २२वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : २ (अमेय पवार २, ११वे मिनिट)
११ वर्षांखालील : जीएनएस गनर्स : १ (सोहम जाधव ११वे मिनिट) वि.वि. गोल्डन गार्डियन्स ०, निरागस नाईटस : १ (अवनीश जोशी ९वे मिनिट) वि.वि. नक्षत्र चित्ता : ० जीएनएस गनर्स : १ (सोहम धुमाळ ६वे मिनिट) वि.वि. निरागस नाइट्स : 0; नक्षत्र चित्ता : ० अनिर्णित वि. गोल्डन गार्डियन्स : ०,
१३ वर्षांखालील : आदित्य ऑलस्टार्स: २ (मल्हार तोडकर २रे मिनिट, अधिनाथ अभय १५वे मिनिट) वि.वि. डायमंड ड्रॅगर्स : १ (आदित्य भालेराव ९वे मिनिट); सक्सेस स्ट्रायकर्स : ७ (शिवराज पाटील ३, ७, १५वे मिनिट, मल्हार घोलप ११, १८वे मिनिट, आर्यन शेडगे १६, १८वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स : १ (रुद्र घंटेलू ५वे मिनिट); सक्सेस स्ट्रायकर्स : ४ (आर्यन शेडगे ५, ९वे मिनिट, मल्हार घोलप १५, १९वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : ०; डायमंड ड्रॅगर्स : १ (खुशी पटेल १४वे मिनिट) अनिर्णित वि. ज्योती जग्वार्स १ (रिझमी अत्तार ७वे मिनिट)
१५ वर्षांखालील : नक्षत्र चित्ता: ४ (आदित्य गावडे १ले मिनिट, सिद्धांत सुरवसे २रे. १७वे मिनिट, प्रतीक ढवळे १५वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०; नक्षत्र चित्ता : २ (प्रतिक ढवळे२रे, १४वे मिनिट) वि.वि. मॅट्रिक मार्व्हल्स ०, मॅट्रिक मार्व्हल्स : ३ (अश्मित दास २रे मिनिट, शिवम पाटील ३रे मिनिट, मनित चौधरी ९वे मिनिट) वि.वि. टीएमपी टायगर्स : ०; टीएमपी टायगर्स : २ (सिद्धेश सोनवणे १०वे मिनिट, पृथ्वीराज हुपले १५वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : १ (मिहिर पाटील १०वे मिनिट)
१५ वर्षांवरील: प्रबल पँथर्स: ३ (आर्यन स्वामी ४थे मिनिट, सात्विक नायक १०वे मिनिट प्रितिश बाबर १६वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : ०; यशस्वी स्ट्रायकर्स : २ (रोहित रावत ४थे मिनिट, अमित जरे १७वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स ०; प्रबल पँथर्स : २ (राघवेंद्र शानभागे ६वे मिनिट, सात्विक नायक १७वे मिनिट) अनिर्णित वि. आदित्य ऑलस्टार्स 2 (वैभव सुवर्णाकर ३रे मिनिट, वरुण लाड १०वे मिनिट); आदित्य ऑलस्टार्स : ० अनिर्णित वि. सक्सेस स्ट्रायकर्स ०
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया