यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघाविरुद्ध मालिका खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मालिकेसाठी संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. परंतु या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील काही महत्वाच्या खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या जुलै महिन्यात, ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर त्यांना ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील ७ मुख्य खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, “पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, झाय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन या खेळाडूंनी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे.” (Seven austrelian Cricketers pulled out of Bangladesh and West Indies tour due to Covid ristrctions)
स्टीव्ह स्मिथ दुखापतग्रस्त
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ दुखापतग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, “स्टीव्ह स्मिथला हाताच्या कोपऱ्यात वेदना जाणवत असल्यामुळे त्याला वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यावरून बाहेर ठेवण्यात आले आहे.” तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे की, काही महिन्याची विश्रांती स्टीव्ह स्मिथला या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ॲशेस मलिकेसाठी फिट ठेवण्यास मदत करेल.
उर्वरित खेळाडू गेल्या एका वर्षापासून ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू बायो बबलमध्येच आहेत. त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी पॅट कमिन्स आणि संघातील इतर खेळाडूंनी या दौऱ्यावर जाणे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘पदार्पणाच्या कसोटीत धमाल करणार,’ धावांचा रतीब घालणाऱ्या सचिनला १७ वर्षीय खेळाडूची भुरळ
आजपासून होणार भारत-इंग्लंड महिला संघांची लढत, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना माझ्यासाठी विश्वचषकाहून कमी नाही,’ पुजाराने फुंकले रणसिंग