---Advertisement---

आयपीएलचे सोळाही हंगाम खेळणारे सात शिलेदार, यादीत सगळेच भारतीय

---Advertisement---

आयपीएल 2023 हंगाम सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. पण चाहत्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. शनिवारी (8 एप्रिल) आयपीएलच्या मैदानात डबल हेडर सामने आयोजित केले गेले. शनिवारचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज मनीष पांडे याने मैदानात पाय टाकता मोठा विक्रम नावावर केला. पांडे आता एमएस धोनीच्या बरोबरीला पोहोचला आहे.

बीसीसीआयने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 2008 साली पहिल्यांता आयपीएलची सुरुवात केली. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणारे काही मोजकेच खेळाडू आजही (IPL 2023) या स्पर्धेत खेळत आहेत. मनीष पांडे (Manish Pandey) देखील या काहीजणांपैकी एक बनला आहे. आयपीएलच्या इतिहासातीय यावर्षी खेळला जाणारा हंगाम सोळावा आहे. असे फक्त 7 खेळाडू आहेत, ज्यांना आतापर्यंतचे सर्व आयपीएल हंगाम खेळले आहेत. शनिवारी मनीष पांडे या यादीत नव्याने जोडला गेला. त्याआदीत यादीत एमएस धोनी, रिद्धिमान साहा, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक या सहा जनांची नावे होती. शनिवारी सातव्या खेळाडूच्या रूपात पांडेचे नाव जोडले गेले. या सातही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात किमान एक सामना खेळला आहे.

आयपीएलच्या सर्व 16 हंगामांमध्ये किमान एक सामना खेळणारे खेळाडू
एमएस धोनी
रिद्धिमान साहा
शिखर धवन
रोहित शर्मा
विराट कोहली
दिनेश कार्तिक
मनीष पांडे

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स हंगामातील त्यांचा तिसरा सामना खेळण्यासाठी गुवाहाटीत पोहोचला. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीने अनुक्रमे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून पराभव स्वीकारला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये मनीष पांड्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. अशात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळवल्यानंतर मनीष पांडेही संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. दिल्ली आणि राजस्थानचा सामना संपल्यानंतर शनिवारची दुसरी लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये होणार आहे. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. (Seven players who played all sixteen seasons of IPL, all Indians in the list)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! कृणाल पंड्याचे लाईव्ह सामन्यात अश्लील कृत्य, अंपायरच्या प्रायव्हेट पार्टला…
आगामी वनडे विश्वचषकात ‘हा’ खेळाडू भारताला बनवणार चॅम्पियन! विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---