सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करणारा महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला. ऋतुराजने याच सामन्यात एका षटकात 7 षटकार ठोकण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली. या खेळीदरम्यान आपल्या डोक्यात काय विचार चालू होता याबाबतचा खुलासा आता ऋतुराजने केला आहे.
ऋतुराज गायकवाड याने या सामन्यात 138.36च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश होता. त्याने डावाच्या 49 व्या षटकात शिवा सिंग याला सात षटकार मारत विश्वविक्रमही रचला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एका षटकात सात षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला. या दरम्यान आपल्या डोक्यात काय विचार चालू होता याबाबत बोलताना ऋतुराज म्हणाला,
“त्या षटकात मी थोडा चान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू चांगला बॅटवर येत होता आणि षटकार गेले. जेव्हा मी पाचवा षटकार ठोकला तेव्हा माझ्या डोक्यात एकच नाव येत होते. ते नाव होते युवराज सिंग याचे. हा नक्कीच अभिमानाचा क्षण असतो जेव्हा तुमचे नाव युवराज सिंगसारख्या दिग्गजाच्या बरोबरीने घेतले जाते.”
भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा एका षटकात सहा षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून युवराज सिंग याची ओळख आहे. त्याने 2007 टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरूद्ध हे सहा षटकार लगावले होते. तर भारताकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये रवी शास्त्री यांनी ही कामगिरी केली आहे.
(Seven Six Hitter Ruturaj Gaikwad Talk About Yuvraj Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंडिया ए चे बांगलादेशवर वर्चस्व! आधी गोलंदाजांचा करिष्मा, नंतर फलंदाजांचा वरचष्मा
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत मझहर ताहेरभॉय याला विजेतेपद