सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. यापूर्वी या दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली होती. ज्यामधे न्यूझीलंड संघाने ही मालिका 2-1 या फरकाने जिंकली होती. मात्र, या मालिकेतील शेवटचा टी-20 सामना पाकिस्तान संघाने जिंकला होता. या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याला दुखापत झाली होती.
मालिकेतील शेवटच्या आणि तिसर्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार्या मालिकेत सहभागी होणार नाही. डॉक्टरने शादाब खानचे एमआरआय स्कॅन केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी शादाब खानला 6 आठवड्याची विश्रांती घ्यायला सांगितली आहे.
Shadab Khan has been ruled out of the #NZvPAK and #PAKvSA Test series due to an injury to his left thigh.
The wrist-spinner is expected to be sidelined for six weeks. pic.twitter.com/NZTa1ZiNAv
— ICC (@ICC) December 26, 2020
शादाब खानला या आठवड्याच्या सुरुवातीला नेपियर येथे झालेल्या तिसर्या टी-20 सामन्यात दुखापत झाली होती. तो दुखापतीमुळे मागील झिम्बाब्वे विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळू शकला नाही. परंतु संघाचे डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले की, मागील वेळेस झालेल्या दुखापतीपेक्षा आताची दुखापत वेगळी आहे.
संघाचे डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले की, “सहा आठवड्यांनंतर वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर पाहणी करेल. ज्यानंतर त्याच्या पुनरागमनाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.”
तत्पूर्वी तो पाकिस्तान संघासोबत न्यूझीलंडमध्ये थांबेल. पाकिस्तान संघाला 26 जानेवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात सध्या पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत 87 षटकात 3 गडी गमावून 222 धावसंख्या उभारली आहे. टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेल अनुक्रमे 4 आणि 5 धावावर बाद झाले आहेत. तसेच रॉस टेलरने 151 चेंडूचा सामना करताना 70 धावांची खेळी केली. त्याचबरोबर केन विलियम्सन नाबाद 94 आणि हेन्री निकोलस नाबाद 42 धावावर खेळत आहेत. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 55 धावा देताना 3 गडी बाद केले आहेत.
शादाब खानने पाकिस्तान संघासाठी 6 कसोटी, 43 वनडे आणि 46 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 300 धावा, वनडेत 337 धावा आणि टी20त 183 धावा केल्या आहेत. सोबतच गोलंदाजी करताना त्याने कसोटीत 14 विकेट्स, वनडेत 59 विकेट्स आणि टी20त 53 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या दिवसाच्या कामगिरीनंतर दिग्गज भारतीय संघावर खुश, ट्विट करत केले कौतुक
नादच खुळा! बीबीएलमध्ये ‘या’ संघाने रचला इतिहास; मिळवला टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
‘क्या करू मर जाऊ’, अजिंक्य रहाणेच्या शानदार नेतृत्त्वावर विराट कोहली ट्रोल; पाहा भन्नाट मिम्स






