इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ब्रिस्टेल येथे एकमेव कसोटी सामन्याची लढत चालू आहे. शुक्रवार रोजी (१८ जून) या सामन्याचा तिसरा दिवस होता. या दिवशी जरी भारतीय संघ पिछाडीवर असला तरीही ‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्मा जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. पहिल्याच डावात अवघ्या ४ धावांनी शतक हुकल्यानंतर दुसऱ्या डावातही तिने धावांची पन्नाशी पार केली आहे. यासह तिने मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३९७ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत तिने १५२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. अखेर केट क्रॉसने तिला त्रिफळाचीत केल्याने अवघ्या ४ धावांनी तिचे पदार्पणातील शतक हुकले.
यानंतर दुसऱ्या डावात फॉलोऑन करताना सलामीला फलंदाजीला येत तिने तिसऱ्या दिवसाखेर नाबाद अर्धशतकी खेळी केली. ६८ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने तिने नाबाद ५५ धावा चोपल्या. अशाप्रकारे पदार्पणातील कसोटीत दोन्ही डावात अर्धशतक करण्याचा शानदार विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.
ती सर्वात कमी वयात पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर पुरुष आणि महिलांमध्ये हा पराक्रम करणारी दुसरीच क्रिकेटपटू ठरली आहे. शेफालीपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने १९९० मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातील दोन्ही डावात अर्धशतकाहून अधिक धावा केल्या होत्या. यावेळी तो १७ वर्षे १०७ दिवसांचा होता. तर शेफालीने वयाच्या १७ व्या वर्षी १३९ दिवसांचे असताना हा किर्तीमान केला आहे. म्हणजे शेफाली आणि सचिनच्या या विक्रमांत केवळ ३२ दिवसांचा फरक आहे.
Shafali Verma's sensational Test debut keeps on getting better ✨
The opener scores her second half-century of the match!
Will she carry on and get her maiden hundred? #ENGvIND | https://t.co/PuEC6vGGgc pic.twitter.com/5RS2gqxplz
— ICC (@ICC) June 18, 2021
याव्यतिरिक्त पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावात ५० पेक्षा अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील चौथी खेळाडू ठरली. यापूर्वी इंग्लंडची लेस्ली कुक, श्रीलंकेची वनीसा बोवेन आणि ऑस्ट्रेलियाची जेफ जॉन्सन यांनी हा पराक्रम केला होता. तसेच भारताकडून हा पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात धावांची पन्नाशी पार करणारी ही सुनिल गावसकरांनंतर पहिलीच भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-