यावर्षी भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे विश्वचषकाचे जयमानपद भूषवणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या वनडे विश्वचषकाची तयारी भारतभर जोरात सुरू आहे. यादरम्यानच क्रीडाजगतात हिंदी सिनेसृष्टीचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख चर्चेत आला. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून आगामी वनडे विश्वचषकाचा प्रोमो शेअर केला गेला, ज्यामध्ये शाहरुख खान देखील दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षीच्या वनडे विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर म्हणून शाहरुख खान (ShahRukh Khan) याच्याकडे जबाबदारी सोपल्याचेही बोलले जात आहे. आयसीसीने आधी बुधवारी (19 जुलै) सायंकाली शाहरुख आणि आयसीसी ट्रॉफीचा फोटो शेअऱ केला. या फोटोची तुफान चर्चा झाली. अशातच गुरुवारी (20 जुलै) आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून वनडे विश्वचषक 2023चा प्रोमो शेअर केला. प्रोमोसाठी शाहरुखचा आवाज वापरला असून व्हिडिओच्या शेवटची किंग खान वनडे विश्वषकाच्या ट्रॉफीसोबत दिसत आहे. चाहत्यांकडून हा व्हिडिओ खूपच कमी काळात तुफान व्हायरल गेला गेला आहे.
https://www.instagram.com/reel/Cu6MPDnr3zh/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, आयसीसी वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. भारतीय संघाला विश्वचषकाती आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळायचा आहे. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्येच 19 नोव्हेंबर 2023 रोजी खेळवला जाईल. एकूण 10 शहरांमध्ये विश्वचषक सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. यात नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, धरमशाला, बेंगलोर, हैदराबाद, पुणे आणि लखनऊ या शहरांचा समावेश आहे. (Shah Rukh Khan has become the brand ambassador for ICC ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 : कोच द्रविडचा Team Indiaला गुरुमंत्र; म्हणाला, ‘पाकिस्तानशी 3 वेळा भिडण्यासाठी…’
‘काका-पुतण्याची मस्त मज्जा’, इरफानच्या पुतण्यासोबतच्या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट