---Advertisement---

शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द

On: सोमवार, मे 27, 2024 10:02 AM
---Advertisement---

जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 ची फायनल जिंकली, तेव्हा बॉलिवूडचा बादशाह आणि टीमचा मालक शाहरुख खान मैदानात आला. शाहरुखनं संपूर्ण स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचं आभार मानलं.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात कोलकातानं सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव केला. सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान केकेआरचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंहला मोठ्या प्रेमानं भेटताना दिसत आहे.

विजयाचा आनंद साजरा करताना जेव्हा शाहरुख खान चेपॉक स्टेडियममध्ये फेऱ्या मारत होता, तेव्हा रिंकू सिंह त्याच्याकडे आला. दोघेही एकमेकांशी काही तरी बोलले. हे शब्द होते ‘God’s Plan’ म्हणजे ‘देवाची योजना’. रिंकू सिंहनं याआधी 16 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2 गडी राखून पराभूत झाल्यावर हे शब्द उच्चारले होते.

फायनलनंतर तो म्हणाला की, “माझं सात वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. शेवटी मी ट्रॉफी उचलेन. मला माझ्या संपूर्ण टीमचा आणि जीजी सरांचा (गौतम गंभीर) अभिमान आहे. ही देवाची योजना होती.” यावर शाहरुख खाननं त्याची मजा घेतली. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाचा डाव 113 धावांत गडगडला. कोलकाता नाईट रायडर्सनं 114 धावांचं लक्ष्य 11व्या षटकात केवळ 2 गडी गमावून गाठलं.

फायनलमधील कामगिरीवरून अंदाज लावता येतो की, कोलकाता या हंगामातील सर्वोत्तम संघ होता. कोलकाता नाईट रायडर्सनं या हंगामात अनेकवेळा 200 हून अधिक धावा केल्या आणि एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलागही केला. केकेआरनं या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा तीनदा पराभव केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्राॅफी जिंकल्यानंतर सुनील नारायणनं चक्क गौतम गंभीरला घेतलं उचलून! सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

पॅट कमिन्सनं सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “आम्ही चौकार-षटकार मारून…”

सुनील नारायणची जादू अन् गौतम गंभीरचा गुरुमंत्र! ‘या’ 5 कारणांमुळे केकेआर 10 वर्षांनंतर बनली चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---