इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs PBKS) संघामध्ये खेळला गेला. हा सामना कोलकाताने ६ विकेट्सने जिंकला. कोलकाताचा हा आयपीएल २०२२ मधील दूसरा विजय आहे. या सामन्यात केकेआरच्या आंद्रे रसल आणि उमेश यादवने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. उमेश यादवने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या, तर रसलने आपले जूने रुप धारण करत चाहत्यांचे मन जिंकले. रसलची फलंदाजी पाहून बॉलिवूड अभिनेता आणि केकेआरचा सहसंघमालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) सुद्धा प्रतिक्रीया दिली आहे.
शाहरुख खानने ट्वीट करत संघाचे अभिनंदन केले आणि रसलच्या शानदार खेळीबद्दल त्याचे अभिनंदन देखील केले. किंग खानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘पुन्हा स्वागत माझ्या मित्रा रसल, केव्हापासून चेंडू एवढा उंच उडताना पाहिला नव्हता.’ उमेशच्या गोलंदाजीवर शाहरुखनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि संघाच्या विजयासाठी कर्णधार श्रेयस अय्यरचे सुद्धा अभिनंदन केले आहे.
Welcome back my friend @Russell12A so long since saw the ball fly so high!!! It takes a life of its own when U hit it Man! And @y_umesh wow! To @ShreyasIyer15 & team well done.Have a happy nite boys.
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 1, 2022
रसलने आपल्या ७० धावांच्या खेळीत ८ षटकार ठोकले आणि केवळ ३१ चेंडूंचा सामना केला. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे संघाला सहज सामना जिंकता आला. उमेशला सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १८.२ षटकात १३७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सर्वाधिक धावा भानुका राजपक्षेने केल्या होत्या, त्याने ९ चेंडूत ३१ धावा केल्या. याशिवाय रबाडाने १६ चेंडूत २५ धावा करत संघाला १३७ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १४.३ षटकांत ४ गडी गमावत पूर्ण केला. आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये आता कोलकाता ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
केकेआरविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवालने आपल्या फलंदाजांना जबाबदार ठरवले आहे. सामना संपल्यानंतर अगरवाल म्हणाला, ‘आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्ही चेंडूने सुरुवातीला चांगली लढत दिली, पण त्यानंतर आंद्रे रसलने क्रीझवर येऊन तुफानी फलंदाजी केली. याचे श्रेय त्याला जाते. आम्ही जवळपास ५० धावांत त्यांचे चार बळी घेतले होते. पण रसलने सामना आमच्यापासून हिरावून घेतला.’ पंजाब संघाचा या हंगामातील हा पहिलाच पराभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली
अभिमानास्पद! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची जीएस लक्ष्मीवर मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर
काय सांगता! राशिद खान स्वत:ला मानत नाही लेग स्पिनर, कारणही केलंय स्पष्ट