अभिनेता शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कटरिना कैफ यांची प्रमुख भूमीका असलेला झिरो चित्रपट सध्या चाहत्यांच्या चांगल्या प्रतिसादात सुरु आहे. या चित्रपटाचे कौतुक करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्काच्या भूमीकेचे देखील कौतुक केले आहे.
त्यानंतर आता शाहरुखने मोठ्या पडद्यावर विराटची भूमीका साकारायला आवडेल असे म्हटले आहे. तसेच तो पुढे म्हणाला, त्याने अनुष्काबरोबर केलेल्या जब हॅरि मेट सेजल या चित्रपटात त्याचा लूक विराट कोहली सारखा होता.
शाहरुखने टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्याला जेव्हा विचारण्यात आले की तूला कोणत्या क्रिकेटपटूची भूमीका करायला आवडेल तेव्हा तो म्हणाला ‘विराट’. त्याच्या या उत्तरावर त्याच्याबरोबर असलेली अनुष्का हसून म्हणाली, त्यासाठी तूला दाढी वाढवावी लागेल.
यावर शाहरुख म्हणाला, ‘पण मी दाढी वाढवली होती. जब हॅरी मेट सेजलमध्ये मी विराट सारखा दिसत होतो. अगदी सारखा.’
तसेच शाहरुखला पुढे प्रश्न विचारण्यात आला की जर तूला चित्रपटात विराटची भूमीका मिळाली तर तूझ्याबरोबर कोणती अभिनेत्री असावी असे वाटते. यावर लगेचच शाहरुख म्हणाला, ‘कटरिना, कारण ती अनुष्कासारखी दिसते आणि मी विराट सारखा.’
शाहरुख आणि अनुष्का यांचा एकत्र भूमीका असलेला हा चौथा चित्रपट आहे. याआधी रबने बना दी जोडी, जब हॅरी मेट सेजल आणि जब तक है जान या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?
–मेलबर्न कसोटीआधी टीम इंडियासाठी ही आहे आनंदाची बातमी
–चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार