भारतीय क्रिकेट संघाला १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (१६ ऑगस्ट) याबाबत ट्वीट करत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच सुंदरच्या रिप्लेसमेंटचीही घोषणा केली आहे.
भारताच्या वरिष्ठ निवड समितीने सुंदरच्या जागी शाहबाज अहमद याची निवड केली आहे. शाहबाज आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे.
सातत्याने दुखापतींशी झगडतोय सुंदर
सुंदर (Washington Sundar) जवळपास एक वर्षापासून वेगवेगळ्या समस्यांमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्याला जानेवारीत कोरोनाची लागण झाली होती. याच कारणामुळे तो संघातून बाहेर झाला होता. यानंतर त्याला दुखापत झाली होती, ज्यातून तो बरा झाला आणि काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. येथे त्याने त्याच्या फिटनेस आणि फॉर्मला सिद्ध केले होते. परंतु स्पर्धेदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो अर्ध्यातूनच काउंटी क्रिकेटमधून बाहेर झाला होता. आता याच खांद्याच्या दुखापतीमुळे तो झिम्बाब्वेविरुद्ध खेळू शकणार नाही.
UPDATE – Shahbaz Ahmed replaces injured Washington Sundar for Zimbabwe series.
More details here – https://t.co/Iw3yuLeBYy #ZIMvIND
— BCCI (@BCCI) August 16, 2022
दरम्यान आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय संघाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असेल. या मालिकेतील सामने अनुक्रमे १८ ऑगस्ट, २० ऑगस्ट आणि २२ ऑगस्ट रोजी खेळले जातील. हे सर्व सामने हरारेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होतील. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता होतील.
झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर , कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
झिम्बाब्वेतील पाणी समस्येमुळे टीम इंडिया हैरान! थेट खेळाडूंच्या अंघोळीवरच लादले नियम
कोहलीच्या खराब फॉर्मबाबत सौरव गांगुलींचे मोठे विधान! म्हणाले, ‘त्याला फक्त…’