भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात २०१९ मध्ये रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीम याला त्यावेळी कुलदीप यादवच्या खांद्याच्या दुखापतीमुळे सामन्याच्या एक दिवसआधी बदली खेळाडू म्हणून संधी दिली गेली आणि त्यानंतर आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात नदीमने ४ विकेट्स घेत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
डावखुरा फिरकीपटू नदीमच्या कारकिर्दीतील भारत विरुद्ध इंग्लंड हा दुसरा कसोटी सामना होता, ज्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नदीमला स्थान दिले गेले. या सामन्यात त्याने ४ विकेट घेतल्या. याच नदीमचे वडिल जावेद महमूद यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, नदीमला लहानपणीपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमसारखा वेगवान गोलंदाज बनायची इच्छा होती. परंतु प्रशिक्षक इम्तियाज हुसेन यांनी त्याची उंची पाहून त्याला फिरकीपटू बनण्याचा पर्याय दिला.
नदीमने शिकावे आणि मोठ्या मुलाने क्रिकेटर व्हावे अशी होती इच्छा
वडील जावेद यांनी सांगितले की, “मला माझा मोठा मुलगा अशहद याला क्रिकेटपटू बनवायचे होते. कारण तो चांगलं क्रिकेट खेळायचा आणि नदीमने शिकावे अशी माझी इच्छा होती. नदीम चांगला खेळाडू होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी दोन्ही मुलांना इम्तियाजकडे घेऊन गेलो. त्यावेळी बारा वर्षांचा नदीम डाव्या हाताने गोलंदाजी करायचा. त्याला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अक्रमसारखे बनायचे होते. परंतु चाचणी झाल्यानंतर प्रशिक्षकाने नदीमची उंची पाहून त्याला फिरकी गोलंदाजी करायचा सल्ला दिला. याउलट इक्बाल हा फलंदाजासह ऑफस्पिनर देखील होता.”
अपेक्षा नसताना १६ वर्षाखालील बिहार संघात राखीव खेळाडू म्हणून निवड
नदीम १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करत होता. बिहारच्या १६ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी नदीमने खूप जिद्द केली असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांना तेथे पाठवले. त्याच्या निवडीची अपेक्षा नसताना देखील वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी राखीव खेळाडू म्हणून नदीमची १६ वर्षांखालील बिहार संघात निवड झाली आणि त्यावेळी इक्बालला त्या संघाचा कर्णधार बनविण्यात आले.
त्याचप्रमाणे बंगालमध्ये १४ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळत असताना बीसीसीआयच्या टॅलेंट सर्च अधिकाऱ्याची त्याच्यावर नजर गेली आणि त्यांनी नदीमला बंगलोर येथे राष्ट्रीय शिबिरासाठी बोलवले. त्यानंतर भारताच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघात नदीमला स्थान मिळून तो शारजाहमध्ये खेळायला गेला.
इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नाही
नदीमचे वडील म्हणाले की, “मी नदीमला इंग्लंड विरुद्ध गोलंदाजी करताना पाहिले आहे. त्याच्या खेळावर मी समाधानी नसून यापेक्षा देखील तो चांगली गोलंदाजी करू शकला असता. माझे स्वप्न होतं की माझा मुलगा भारतीय संघाबरोबर खेळेल आणि ते स्वप्न तो पूर्ण करत आहे. त्याने चांगली कामगिरी करून कायमस्वरूपी गोलंदाज म्हणून भारतीय संघात सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे.”
नदीम वेगवान गोलंदाज होऊ शकत नाही- प्रशिक्षक
प्रशिक्षक इम्तियाज हे नदीमविषयी बोलताना म्हणाले की, “तो वेगवान गोलंदाज होऊ शकतं नाही. मी त्याची बोटे पाहिली आहेत. मला वाटते की तो फिरकीपटू म्हणून चांगला खेळू शकेल. नदीम डाव्या हाताने गोलंदाजी करत असल्याने मी त्याला बिशन सिंग बेदी सारखा डाव्या हाताचा फिरकीपटू बनवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भावांनी क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम देखील घेतले आहेत.”
“ज्यावेळी मी कामावरून संध्याकाळी त्यांना शिकवायला जायचो तेव्हा मी दोन्ही भावांना शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देत असत. त्यावेळी मला एकदा कळले होते की. ते दोघेही टेनिस बॉल क्रिकेट सामना खेळण्यासाठी गेले आहे. त्यावेळी मी त्यांना फटकारले आणि सांगितले की, जर तुम्ही पुन्हा क्रिकेट खेळायला गेलात. तर मी दोघांनाही प्रशिक्षण देणार नाही आणि तेव्हा पासून ते दोघे पुन्हा कधीच तिथे गेले नाहीत,” असे शेवटी ते म्हणाले.
शाहबाज नदीमची क्रिकेट कारकिर्द
नदीमने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण दोन कसोटी सामने खेळेल असून त्यात ८ विकेट्सचा समावेश आहे. तर आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ७१ सामने त्याने खेळले असून ४७ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचं मोठं पाऊल! चेन्नई कसोटीतील टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर पिच क्यूरेटरची सुट्टी
ये दीवार टूटती क्यों नहीं है भाई? कोहलीनंतर पुजारा होता कमिन्सच्या निशाण्यावर, आता स्वत:च केलं कौतुक





