---Advertisement---

दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला आफ्रिदी संघासोबत युएईत काय करतोय? चाहत्यांनी विचारले तिखट सवाल

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 10:35 AM
Shaheen Afridi & Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या सतत चर्चेत असते. तो दुखापतीमुळे आफ्रिदी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी वक्तव्ये करून हा संघासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आफ्रिदी पाकिस्तानी संघासोबत दुबईत दिसत आहे. विमानतळ आणि प्रशिक्षण मैदानावरून त्याची छायाचित्रे समोर आली आहेत.

Shaheen-Afridi-UAE
Photo Courtesy: Twitter/TheRealPCB
Shaheen-Afridi-UAE-1
Photo Courtesy: Twitter/TheRealPCB

प्रशिक्षणादरम्यान आफ्रिदी अफगाणिस्तान संघातील दोन अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी आणि राशिद खान यांच्याशी बोलताना दिसला. तेव्हापासून सोशल मीडियावर लोक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) खिल्ली उडवत आहेत. पीसीबीने जारी केलेल्या फोटोमध्ये आफ्रिदी कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानसोबत दिसत होता. त्यामुळे आता शाहीनला दुखापत झाली आहे आणि त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे तरीही तो संघासोबत काय करत आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांना घाबरले पाकिस्तान! एक गोलंदाजी प्रशिक्षक असतानाही दुसऱ्याची केलीय नियुक्ती
‘असं लग्न करू शकत नाही!’ केएल राहुल- आथिया शेट्टीच्या नात्यावर सुनिल शेट्टीने नोंदवली हरकत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---