---Advertisement---

“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 10:41 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आशिया चषकातील सुपर फोर सामना कोलंब येथे खेळला गेला. नियोजित वेळापत्रकानुसार हा सामना 10 सप्टेंबर रोजी सुरू झाला. मात्र, भारतीय डावाच्या मध्यात पाऊस आल्याने व त्यानंतर मैदान खराब झाल्याने उर्वरित खेळ दुसऱ्या दिवशी खेळण्याचे निश्चित झाले. त्याचवेळी खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांनी सर्वांचे मन जिंकणारी कृती केली.

भारतीय संघाचा डाव सुरू असताना 24.1 षटकानंतर पावसाचे आगमन झाले. जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाल्याने मैदान काहीसे खराब झाले होते. पाऊस थांबल्यानंतरही मैदान कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत खेळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर खेळ दुसऱ्या दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शाहा आफ्रिदी याने भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला थांबवले. आफ्रिदी आपल्या सोबत एक भेटवस्तू घेऊन आला होता. त्याने ती भेटवस्तू बुमराह याला देताना म्हटले,

“भाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या शहजाद्याला ही एक छोटीशी भेटवस्तू. अल्ला त्याला खुश ठेवेल आणि तो नवा बुमराह बनतो”

त्यानंतर बुमराह याने त्याला धन्यवाद म्हटले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

रविवारी झालेल्या खेळाबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 24.1 षटकांत 147 धावा बनवल्या आहेत. भारतासाठी विराट कोहली व केएल राहुल अद्याप मैदानावर आहेत.

(Shaheen Afridi delivers smiles to new dad Jasprit Bumrah video goes viral)

हेही वाचाच-
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---