पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. मात्र, त्यानंतरच्या चारही सामन्यांमध्ये आफ्रिदीने विकेट्स घेतल्या. बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) टी20 विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 7 विके्टसने विजय मिळवला. आफ्रिदीने या सामन्यातही पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. विशेष म्हणजे, तो डावाचे पहिलेच षटक टाकताना असे काही घडले, जे क्वचितच क्रिकेट विश्वात पाहायला मिळाले असेल.
नेमकं काय घडलं?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) सामन्यात न्यूझीलंड संघ नाणेफेक जिंकत फलंदाजीला उतरला होता. यावेळी डावाचे पहिलेच षटक पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) टाकत होता. यावेळी त्याने पहिल्या चेंडूवर फलंदाज फिन ऍलेन (Finn Allen) याने ऑफ साईडच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू त्याच्या पॅडवर लागला आणि पंच मरे इरॅस्मस यांनी त्याला बाद घोषित केले. मात्र, ऍलेनने लगेच रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागला होता. अशात टीव्ही पंचांनी ऍलेनला नाबाद घोषित केले.
AICC Men’s T20 World Cup 2022 | PAK v NZ | A cracking start to the game!
Copy: A superb start so far for Pakistan in the first semi-final!🇳🇿 or 🇵🇰 – who will go on to win this? Stay tuned to Star Sports & Disney+Hotstar to find out.
ICC Men's #T20WorldCup 2022 | #PAKvNZ pic.twitter.com/qTxD22uEHn— Star Sports (@StarSportsIndia) November 9, 2022
पुन्हा केले पायचीत
शाहीन आफ्रिदीचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऍलेनच्या पॅडवर लागला. यावेळीही पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यानंतर ऍलेनने पुन्हा रिव्ह्यू घेतला. मात्र, यावेळी चेंडू बॅटला लागला नव्हता आणि यष्टींना लागत होता. अशात टीव्ही पंचांनी त्याला बाद घोषित केले. यानंतर डेवॉन कॉनवे याने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोदेखील 20 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतला. शादाब खान याने त्याला धावबाद केले. ग्लेन फिलिप्स 6 धावा करत मोहम्मद नवाजचा शिकार झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टी20 आणि वनडे विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ चौथ्यांदा उपांत्य सामन्यात आमने-सामने आले होते. यापूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. त्यांनी 1992, 1999 आणि 2007मध्ये विजय मिळवला होता. आता या विजयांमध्ये 2022च्या उपांत्य सामन्याचाही समावेश झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार