---Advertisement---

माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 12:55 PM
Mohammed Shami Shaheen Afridi
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांनी टी-20 विश्वचषकात स्वतःच्या संघासाठी पुनरागमन केले. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हे दोघेही संघातून बाहेर होते. दोन्ही खेळाडू त्यांच्या-त्यांच्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. असे असले तरी, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मते शाहीन आफ्रिदीच्या तुलनेत मोहम्मद शमीने जबरदस्त पुनरागमन केले आहे. 

शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आशिया चषक 2022 च्या आधी दुखापतीचा शिकार झाला. त्यानंतर मोठ्या काळापर्यंत तो मैदानात पुनरागमन करू शकला नाही. टी-20 विश्वचषकाच्या ठीक आधी त्याने संघात पुनरागमन केले. भारताविरुद्धच्या सामन्याने पाकिस्तान विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहे. दुसरीकडे मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारतासाठी शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मागच्या वर्षी यूएईत टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातून ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, ते पाहून दिग्गज संजय बांगर (Sanjay Bangar) चांगलेच प्रभावित झाले आहेत.

बांगर यांना वाटत नाही की, शाहीन आफ्रिदी मोहम्मद शमीप्रमाणे पुनरागमन करू शकला आहे. माध्यमांशी बोलताना बांगर म्हणाले की, “मला वाटत नाही की, शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन मोहम्मद शमीसारखे झाले आहे. चांगली गोष्ट ही आहे की, त्याने आतमध्ये स्वींग होणारा एकही चेंडू टाकला नाहीये. त्याचे सर्व चेंडू फलंदाजापासून लांब जाताना दिसले. याचा अर्थ असाच होतो की, क्रिजवरील पोजिशनविषयी त्याला अजूनही पुर्णपणे विश्वास नाहीये.”

भारताने सोमवारी (7 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळळेल्या सराव सामन्यात शमी खेळला आणि जबरदस्त प्रदर्शन देखील केले. त्याला या सामन्यात फक्त एक षटक टाकण्याची संधी मिळाली आणि या एकाच षटकात त्याने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदीचा विचार केला, तर तो पाकिस्तान संघातील सध्या सर्वात वेगवान गोलंदाज आहे. मागच्या टी-20 विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि संघाला मोठा झटका दिला होता. यावर्षी देखील चाहत्या त्याच्याकडून अशाच प्रदर्शानाच्या अपेक्षा ठेवून आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांने चांगली गोलंदाजी केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्षांनंतर आता निवड समितीत ‘हा’ मोठा बदल होणार! जाणून घ्या काय आहे प्रकरण
‘मग पुढच्या वर्षी होणार विश्वचषकही…’, पाकिस्तानी क्रिकेटपटूचे बीसीसीआयला प्रत्युत्तर  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---