पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं हरिस रौफ वादावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यानं आपल्या सहकारी गोलंदाजाचं समर्थन केलं. “मी पूर्णपणे हरिस रौफच्या पाठीशी असून कोणीही खेळाडूंसोबत गैरवर्तन करू नये”, असं तो म्हणाला.
वास्तविक, हरिस रौफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत त्याचं अमेरिकेत एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यासोबत भांडण झाल्याचं दिसतं होतं. हरिस रौफ त्या पाकिस्तानी व्यक्तीला भारतीय असल्याचं समजून मारण्यासाठी धावला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हरिस रौफ आपल्या पत्नीसोबत कुठेतरी जात असताना अचानक तो एका व्यक्तीला मारण्यासाठी धावला. दरम्यान, तिथे उपस्थित लोक येऊन हस्तक्षेप करतात आणि हरिसला सांभाळतात.
या दरम्यान ती व्यक्ती, मी हरिस रौफचा चाहता आहे आणि फक्त एक फोटो हवा आहे, असं म्हणताना ऐकू येतं. यावर हरिस रौफ म्हणतो की तो भारतीय आहे का? यावर त्या व्यक्तीनं तो पाकिस्तानी असल्याचं उत्तर दिलं. यावर, पाकिस्तानी असूनही तू असं वागतो, शिवीगाळ करतो, असं हरिस रौफ म्हणतो.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना हरिस रौफ म्हणाला की, जेव्हा कोणी माझ्या कुटुंबाबद्दल किंवा पालकांबद्दल काही बोललं तर मी गप्प बसणार नाही.” रौफच्या या वक्तव्यानंतर अनेक पाकिस्तानी खेळाडू त्याच्या समर्थनार्थ पुढे आले. आता पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनंही ट्विट करत हरिस रौफचं समर्थन केलं आहे.
शाहीन आफ्रिदी म्हणाला, “हरिस रौफला ज्या प्रकारे वागणूक दिली गेली ती अत्यंत निंदनीय आहे. इतरांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्या लोकांनी असे व्हिडीओ शेअर केले, मला त्यांचंही आश्चर्य वाटतं. हरिस रौफ तु खंबीर राहा. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत.”
It is absolutely disgraceful how Haris Rauf was treated. No one has the right to belittle and disrespect another person. I’m also shocked by those who have shared this video. Why prioritize a few likes over our humanity? Stay strong, Haris. We stand united with you.
— Shaheen Shah Afridi (@iShaheenAfridi) June 18, 2024
विशेष म्हणजे, केवळ शाहीन आफ्रिदीच नाही तर अहमद शहजाद, कामरान अकमल आणि हसन अली या क्रिकेटपटूंनीही या प्रकरणी हरिस रौफला पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हारिस रौफनं दिली प्रतिक्रिया
पाकिस्तानी क्रिकेटपटूची भररस्त्यात सटकली, थेट चाहत्यावरच गेला धावून; VIDEO व्हायरल
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला