पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामधील एकही सामना यजमानांना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. काही आजी-माजी खेळाडूंनी तर त्याला कर्णधारपदावरून काढा अशी मागणी केली आहे. असे असताना बाबरच्या संघसहकाऱ्यांनी मात्र त्याचे समर्थन करताना तो आमचा कर्णधार आहे आणि राहणारच अशा प्रकारचे ट्वीट केले आहे.
इंग्लंडविरुद्ध बाबर आझम याची बॅट चालली (3 सामन्यात 348 धावा), मात्र नेतृत्वात तो कुठे ना कुठे तरी कमी पडला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने पाकिस्तानने कसोटीच्या इतिहासात प्रथमच तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी गमावली. त्याचबरोबर या मालिकेतील तिसरा सामना कराची येथे खेळला गेला, जेथे पाकिस्तान सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा संघ आहे. त्याच मैदानावर सामना गमावल्याने पाकिस्तानच्या दिग्गजांनी राग व्यक्त केला आहे. यामुळे तो नेतृत्व करू शकत नाही, असे विधान काहींनी केले आहे. यावरून वेगवान गोलंदाजी शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने ट्वीट केले. ज्यामध्ये त्याने बाबरचे समर्थन करताना चाहत्यांना या संघाला पाठिंंबा द्या, अशी विनंती केली आहे.
शाहीनने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘बाबर आझम हा आमचा आणि पाकिस्तानची शान असून तो आमचा कर्णधार आहे आणि राहणारच. त्याविरुद्ध विचार करणे अयोग्य. या संघाला पाठिंंबा द्या. कारण हाच संघ तुम्हाला जिंकवू शकतो. अजून वेळ गेलेली नाही.’
https://twitter.com/iShaheenAfridi/status/1605234846070378496?s=20&t=aslQKlGap3Yml20cA9brrg
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल लागल्यानंतर आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या गुणतालिकेत बदल दिसले. पाकिस्तान सातव्या, तर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. पाकिस्तान घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळणार असून त्याची सुरूवात 26 डिसेंबरपासून होणार आहे.
शाहीनबाबत पाहिले तर तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याला आशिया कप 2022च्या समोरच ही दुखापत झाली होती. ज्यामुळे तो त्या संपूर्ण स्पर्धेला मुकला होता. नंतर त्याने टी20 विश्वचषकात संघपुनरागमन केले. Shaheen Afridi Tweet About Babar Azam Captaincy, PAKvENG Test Series
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: बांगलादेशमध्ये मेस्सी फिव्हर! प्रॅक्टिस कॅम्पमध्ये बांगलादेशी खेळाडूने घातली अर्जेंटिनाची जर्सी
वाढदिवस विशेष- क्रिकेटर के श्रीकांत