फ्रँचायझी क्रिकेट दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे सुरू झालेला हा प्रवास जगभरातील लीगपर्यंत पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. मात्र, इतर जवळपास सर्व देशांचे खेळाडू विदेशी लीग खेळताना. पाकिस्तानचा वेगावन गोलंदाज शाहीन आफ्रिदी आता अजून एका विदेळी टी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्या सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात पाकिस्तान संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे महत्व मागच्या काही वर्षात चांगलेच वाढल्याचे दिसेत. आफ्रिदी आता यूएईच्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20मध्ये खेळताना दिसणार आहे. आयएलटी-20 मध्ये खेळताना शाहीन आफ्रिदी पहिली पाकिस्तानी खेळाडू देखील ठरणार आहे. डेजर्ट वायपर्स संघासोबत पुढच्या तीन वर्षांसाठी त्याने करार देखील निश्चित केला आहे.
आयएलसी-20 (ILT-20) लीगचा आगामी हंगाम 13 जानेवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023) नंतर पाकिस्तान संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. हा दौरा संपल्यानंतर शाहीन आफ्रिदी डेजर्ट वायपर्स संघासोबत जोडला जाईल. या फ्रँचायझीसोबत करार निश्चत झाल्यानंतर आफ्रिदी म्हणाला की, “मी डेजर्ट वायपर्स संघात सामील होण्यासाठी उत्सुक आहे. यूएईमध्ये पाकिस्तान क्रिकेटच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. मला आशा आहे की ते सर्वजण आगामी आयएलटी20 हंगामात आमच्या संघाला समर्थन देतील.” दरम्यान, शाहीनच्या डेजर्ट वायपर्स संघाने मागच्या हंगामात उपविजेतेपद पटकावले होते.
शाहीन आपल्या संघात सामील झाल्यामुळे डेजर्ट वायपर्स संघाचे डायरेक्टर टॉम मुडी खुश आहेत. मुडी म्हणाले, “शाहीन जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याने फक्त पाकिस्तानच नाही, तर ज्या-ज्या संघासाठी खेळले आहे, त्याठिकाण चांगला प्रभाव पाडला आहे. विरोधी संघाची वरची फळी उद्ध्वस्त करण्याचे आणि नेतृत्वाचे गुण शाहीनमध्ये आहेत. डेजर्ट वायपर्स संघासाठी हे गुण महत्वाचे ठरतील.” (Shaheen Afridi will play for new team in ILT-20)
महत्वाच्या बातम्या –
“पृथ्वी अत्यंत नम्र खेळाडू”, नॉर्दम्पटनशायरच्या प्रशिक्षकांनी उधळली स्तुतीसुमने
BREAKING! इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज निवृत्ती! तडकाफडकी निर्णय घेण्यामागे आहे ‘हे’ कारण