ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी खेळला नाही. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला सिडनी कसोटीत विश्रांती दिली गेली होती. अनेकांनी पाकिस्तानला मिळालेल्या पराभवासाठी शाहीनला दिलेली विश्रांती जबाबदारी धरली. पण वेगवान गोलंदाजाने स्वतः सिडनी कसोटीत न खेळण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा काही दिवासंपूर्वीच संपन्न झाला. या दौऱ्यात तीन सामन्याची कसोटी मालिका पाकिस्तानने खेळली. पण मालिकेतील एकही सामना त्यांना जिकता आली नाही. सिडनीमध्ये तिसरा आणि शेवटचा सामना पाकिस्तानने चार दिवसांमध्ये गमावला. शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) या सामन्यात खेळला नाही. वेगवान गोलंदाजाच्या अनुपस्थितीत त्याच्या दुखापतीबाबत चर्चा सुरू झाल्या. पण शाहीनने स्वतः आता याविषयी माहिती दिली आहे. शाहीनच्या म्हणण्यानुसार दुखापतीची खबरदारी म्हणून त्याला सिडनी कसोटीत खेळवले गेले नाही.
पाकिस्तानला आपली पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध टी-20 प्रकारातील खेळायची आहे. शाहीन या फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार असून मालिका सुरू होण्याआधी त्याने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी फिटनेसची माहिती देताना शाहीन म्हणाला, “मी पूर्णपणे फिट आहे. मी पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जरा जास्तच गोलंदाजी केली होती. त्याचसोबत थकवा देखील आला होता. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन म्हणटले की, दुखापतीची शक्यता आहे आणि त्यांना ते नको होते. जर मालिका जिंकण्याचे किंवा बरोबरीची शक्यता असती, तरीही मी खेळलो असतो. दुखापतीचा धोका टाकण्यासाठी मला विश्रांती दिली गेली. बाकी कसोटी क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच प्राथमिकता राहिले आहे. मला हा क्रिकेटचा फॉरमॅट आवडतो. माझी पत्नी मला म्हणाला की, जर तुम्ही कसोटी क्रिकेट खेळले, तरच मोठे क्रिकेटपटू होऊ शकाल.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत व्हाईट वॉश मिळाल्यानंतर पाकिस्तान संघ आगामी मालिकेत जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. काही दिवसांपूर्वीच शाहीनला बाबर आझम याच्या जागी पाकिस्तानचा टी-20 कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. अशात नव्या कर्णधाराच्या रुपात संघ न्यूझीलंडविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे पाहण्यासारखे असेल. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (12 जानेवारी) आयोजित केला गेला आहे. (Shaheen Afridi’s reaction to the not playing in Sydney Test)
महत्वाच्या बातम्या –
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने
“भारताच्या वनडे आणि टी20 संघात ‘हा’ खेळाडू खूप महत्त्वाचा”, युवा फलंदाजाबद्दल माजी क्रिकेटपटूचं विधान