---Advertisement---

‘शाहीन-हॅरिस चांगली बॉलिंग करत नाहीयेत अन् लोक मलाच शिव्या देतायेत’, माजी क्रिकेटरचे धक्कादायक विधान

Haris-Rauf-And-Shaheen-Afridi
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न पोहोचू शकणाऱ्या 6 संघाच्या यादीत पाकिस्तान क्रिकेट संघाचाही समावेश आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू न शकण्यामागील कारण त्यांची वेगवान गोलंदाजी असल्याचे बोलले जात आहे. एकेवेळी संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचा दबदबा होता. मात्र, पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी निराश केले आणि संघ 9 पैकी 5 सामने गमावत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. अशात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेद याने खळबळजनक विधान केले.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेद (Aqib Javed) याने मोठे विदधान करत म्हटले की, हॅरिस रौफ (Haris Rauf) आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) टी20चे गोलंदाज आहेत. आम्ही त्यांना वनडे संघात संधी दिली. हॅरिसने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत एकूण 533 धावा खर्च केल्या. या एका गोलंदाजाने विश्वचषकात खर्च केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. अशात आकिबने दावा केला आहे की, शाहीन आणि हॅरिसला टी20 क्रिकेटनुसार घडवले आहे. तसेच, ते त्याच क्रिकेट प्रकारात चांगले खेळतात. आकिबच्या या विधानावर टीकाही केली जात आहे.

काय म्हणाला आकिब?
आकिब जावेद याने पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हटले की, “मला मागील आठवड्यांपासून शिव्या दिल्या जात आहेत की, हॅरिस चांगली गोलंदाजी करत नाहीये. शाहीन मधल्या आणि अखेरच्या षटकात प्रभावी नाहीये. अरे भावांनो आम्ही त्यांना पूर्णपणे टी20 क्रिकेटसाठी तयार केले आहे. आम्ही त्यांंना घेऊन आलो आणि त्यांना खेळवले.”

खरं तर, आकिब जावेद पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाचा संचालक आहे. हे दोन्ही खेळाडू पीएसएलमध्ये याच संघाचा भाग राहिले आहेत.

पाकिस्तानचा पुढील दौरा
विश्वचषकात खराब प्रदर्शन केल्यानंतर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 6 डिसेंबरपासून होत आहे. यामध्ये त्यांना 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यांना विश्वचषकातील खराब प्रदर्शनाच्या आठवणींना मागे सोडावे लागेल. तसेच, पाकिस्तान क्रिकेटला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काही बदल करावे लागतील. त्यातील एक बदल असा आहे की, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल याने आपल्या पदाचा राजीनामाही दिली आहे.

हेही वाचा-
आख्ख्या वर्ल्डकपमध्ये फक्त रोहितचाच रुबाब! ‘हे’ आहेत वर्ल्डकप 2023मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 5 धुरंधर
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---