वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील 10 पैकी 4 सुपरफॉर्मातील संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली. तसेच, प्रयत्नांची पराकाष्टा करूनही 6 संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळवता आले नाहीये. या 10 संघांमध्ये साखळी फेरीतील 45 सामने पार पडले आहेत. आता स्पर्धेतील 2 उपांत्य आणि अंतिम सामना बाकी आहे. या तीन सामन्यांपूर्वी साखळी फेरीनंतर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या 5 धुरंधरांबद्दल जाणून घेऊयात.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताचा 1, दक्षिण आफ्रिकेचा 1 आणि ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज आहेत. विशेष म्हणजे, उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या न्यूझीलंड संघाच्या एकाही फलंदाजाला सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले नाहीये.
विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 5 फलंदाज
5. डेविड वॉर्नर
या विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आहे. त्याने 9 सामन्यात 20 षटकार मारले आहेत. या षटकारांच्या मदतीने त्याने 499 धावाही केल्या आहेत.
4. मिचेल मार्श
यादीत चौथ्या स्थानीही ऑस्ट्रेलियाचाच अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) आहे. त्याने 8 सामन्यात 20 षटकार मारले आहेत. यासोबतच त्याने 426 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, मार्श आणि वॉर्नर या दोघांच्या षटकारांची संख्या एकसारखी आहे. मात्र, मार्शने हे षटकार फक्त 8 सामन्यात मारल्यामुळे तो यादीत चौथ्या स्थानी विराजमान आहे.
The big hitters 💥🚀
How many more will we see in the #CWC23 semi-finals? 💪
More stats 📲 https://t.co/N2FkV2klLj pic.twitter.com/9xNjTal4af
— ICC (@ICC) November 14, 2023
3. क्विंटन डी कॉक
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने मिळवले आहे. डी कॉकने 9 सामन्यात 21 षटकार मारले आहेत. हे षटकार मारत त्याने 591 धावा केल्या आहेत.
2. ग्लेन मॅक्सवेल
आपल्या फलंदाजीने अवघ्या क्रिकेटविश्वाला भुरळ घालणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मॅक्सवेलने 7 सामन्यात फलंदाजी करताना 22 षटकारांची बरसात केली आहे. तसेच, 397 धावाही केल्या आहेत. मॅक्सवेलने या विश्वचषकात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
1. रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या यादीतील अव्वलस्थान आपल्या नावे केले आहे. ‘हिटमॅन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहितने या स्पर्धेत 9 सामने खेळताना सर्वाधिक 24 षटकारांची बरसात केली आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 503 धावाही निघाल्या आहेत. 131 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. (5 Batsmen with Most Sixes in World Cup 2023 see list)
हेही वाचा-
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक
आयपीएल 2024मध्ये खेळण्याविषयी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी आयपीएलच्या लिलावात…’