पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. मात्र, तरीही त्याच्या गोलंदाजीमध्ये तीच धार पुन्हा पाहायला मिळत आहे. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अधिकृत सराव सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आला. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने त्याची सर्व 4 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याच्या एका यॉर्करने अफगाणिस्तानच्या सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज याला रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडले.
नवीन चेंडूने फलंदाजांच्या मनात धाक निर्माण करणारा गोलंदाज म्हणून शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) याने ओळख निर्माण केले आहे. खरं तर, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर आफ्रिदीने असा काही खतरनाक यॉर्कर टाकला की, यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याला त्याचा सामनाच करता आला नाही. चेंडू थेट त्याच्या पायाच्या बोटांवर लागला.
या चेंडूमुळे गुरबाज फक्त बादच झाला नाही, तर वेदनेने विव्हळू लागला. त्याला इतक्या वेदना होत होत्या की, तो चालत मैदानाबाहेर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला पाठीवर बसवून बाहेर घेऊन जाण्यात आले.
https://twitter.com/hf_302/status/1582573045071327232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582573045071327232%7Ctwgr%5Eb0aead7af2ce1da23d29211b94fa87a042c6da09%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Fshaheen-shah-afridi-deadly-yorker-sends-afghanistan-opener-to-hospital-in-t20-world-cup-2022-warm-up-match-tspo-1559093-2022-10-19
आफ्रिदीचे खतरनाक षटक
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर आफ्रिदीने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा दिल्या. यावेळी त्याने 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. मात्र, त्याचे पावरप्लेमधील षटक जास्त खतरनाक होते. त्यात त्याने 2 षटके गोलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाज आणि हजरतुल्लाह झझाई यांना तंबूत धाडले. या दोन्ही फलंदाजांना अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजी फळीचा कणा मानले जाते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रुग्णालयात पोहोचला रहमानुल्लाह गुरबाज
हाती आलेल्या वृत्तानुसार, रहमानुल्लाह याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याचा पाय स्कॅन करण्यात आला. अफगाणिस्तान संघासोबतच गुरबाजचे चाहतेही ही दुखापत मोठी नसावी अशी प्रार्थना करतायेत. विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं, तर अफगाणिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) खेळायचा आहे. अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसोबत अ गटात आहे. आता या सामन्यात अफगाणिस्तान काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर