---Advertisement---

शाहीन आफ्रिदीने सासऱ्याप्रमाणे राखला तिरंग्याचा मान, भारतीय चाहत्याची इच्छा पूर्ण करत जिंकले सर्वांचे मन

Shahid-Afridi-And-Shaheen-Afridi
---Advertisement---

सध्या सर्वत्र टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेतील साखळी सामने संपले असून उपांत्य फेरी सुरू आहे. यातील पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. मात्र, या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी भारतीय तिरंगा हातात घेऊन दिसला. यादरम्यानचा त्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हा सध्याच्या डावखुऱ्या हाताच्या घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची क्रेझ भारतातही आहे. मंगळवारी (दि. 08 नोव्हेंबर) शाहीनने नेट्सवर चांगलाच सराव केला. त्यानंतर तो आपल्या चाहत्यांना भेटला. अशात त्याने आपल्या अनेक चाहत्यांसोबत फोटो कढले आणि ऑटोग्राफही दिले. यामध्ये एका भारतीय चाहत्याने तिरंग्यावर शाहीन आफ्रिदीचा ऑटोग्राफ मागितला. यावेळी आफ्रिदीनेही मोठ्या उदारतेने त्या चाहत्याची इच्छा पूर्ण केली. यानंतर आफ्रिदीचा भारतीय तिरंग्यावर ऑटोग्राफ (Shaheen Afridi Indian Flag Autograph) देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हा शाहीनचा सासरा आहे. मागील काही वर्षांपूर्वी आफ्रिदीचाही एका भारतीय चाहत्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये त्या चाहत्याने हातात भारतीय तिरंगा पकडला होता.

टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानची एन्ट्री
पाकिस्तान संघाने टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अत्यंत नाटकीय अंदाजात प्रवेश केला. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ त्यांचे सुरुवातीचे दोन सामने भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून पराभूत झाला होता. दुसरीकडे, त्यांनी आपल्या शेवटच्या तीन सामन्यात नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघाला पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला. आफ्रिदीने बांगलादेशविरुद्ध शानदार गोलंदाज केली होती. त्याने या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही शानदार गोलंदाजी करत 2 विकेट्स घेतल्या.

या विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 6.17च्या इकॉनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या आहेत. (shaheen shah afridi gives his autograph on indian flag photo goes to viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार

टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---