संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकाची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली. त्यातही दुसऱ्या गटात समावेश असलेला पाकिस्तानचा संघ आपला विजयरथ कायम राखत सलग ३ सामन्यात अपराजित राहिला आहे. शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) दुबई येथे अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात २४ वा सामना झाला. या सामन्यातही पाकिस्तानने ५ विकेट्सने बाजी मारली. या सामन्यास पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिन आफ्रिदी याने उपस्थिती लावली होती. त्याचा स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.
स्वत: शाहिन आफ्रिदीने आपला सामना पाहण्यासाठी आलेला स्टेडियममधील फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफिद्री याच्यासोबत त्याच्या मुलीही या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आल्या होत्या. आफ्रिदीने आपला स्टँड्समधील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एकवेळ खेळताना मजा येत होती आता त्यांनाच खेळताना पाहण्यात मजा येते आहे.’
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1454098568634044420?s=20
महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात आफ्रिदीचा होणारा जावई शाहिन शाह आफ्रिदीही खेळत होता. त्यामुळे अनेकांनी आफ्रिदी त्याच्या जावयाला खेळताना पाहण्यासाठी आला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Shahid Khan Afridi 🔥🔥🔥 #PakvAfg pic.twitter.com/EzKVRGVp9Q
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) October 29, 2021
इतकेच नव्हे तर, आफ्रिदी सामना पाहण्यासाठी आल्याचे पाहून त्याचा माजी संघ सहकारी आणि सध्याच्या पाकिस्तान टी२० विश्वचषक संघाचा भाग असलेला शोएब मलिक खूप खुश झाल्याचे दिसले. तो सामन्यानंतर आफ्रिदीला व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेले पाहून मलिकने त्याला कडक सॅल्यूट ठोकला. हा प्रसंग सामन्यानंतर घडला आहे.
Its a salute from Shoaib Malik to Shahid Afridi!
Veterans meet. 🇵🇰 pic.twitter.com/xIx8fF2th8
— World Cricket (@WorldCricket01) October 29, 2021
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पाकिस्तानच्या खेळाडूंच्या पुढे अफगानिस्तानच्या संघाने गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अफगानिस्तानला १४७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पुढे मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या आसिफ अलीने चौफेर फटकेबाजी करत १९ व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमची विराट कोहलीला टक्कर! आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ‘या’ विक्रमाच्या यादीत साधली बरोबरी